World Cup 2019 India vs South Africa : धोनी कॉम्प्युटरपेक्षा जास्त वेगवान : शोएब अख्तर

भारतीय टीम ही माझी आवडती टीम आहे. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच नक्कीच जिंकेल असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.

World Cup 2019 India vs South Africa : धोनी कॉम्प्युटरपेक्षा जास्त वेगवान : शोएब अख्तर

World Cup 2019 India vs South Africa लंडन : “टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॉम्प्युटरपेक्षा जलद आहे. त्याला कोणत्या मैदानात कसं खेळायचं याची सर्व माहिती असते,” असे पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने धोनी विषयी बोलताना व्यक्त केलं आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार सुरु झाला आहे. अनेक दिग्गज भारतीय संघाला यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानतात. आज 5 जून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगत आहे. या सामन्याआधी केलेल्या एका सखोल विश्लेषणादरम्यान शोएब अख्तरने धोनीची स्तुती केली आहे.

या विश्लेषणादरम्यान टीम इंडियाची विश्वचषकादरम्यान रणनिती काय असेल याबाबत शोएबने सांगितले. “टीम इंडियामध्ये चांगले गोलंदाज, फलंदाज आहे. त्याशिवाय इंडियाच्या टीममध्ये धोनीसारखा अनुभवी कर्णधार आहे. धोनीचं डोक कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करते. मॅचदरम्यान कॉम्प्युटरने सांगण्याच्या आधी धोनी विकेट कसे मिळतील या दृष्टीने टीमचं क्षेत्ररक्षण ठरवतो. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विश्वचषकादरम्यान धोनीचा अनुभव फार कामी येणार आहे,” असे शोएबने धोनी विषयी बोलताना सांगितले.

भारतीय टीम ही माझी आवडती टीम आहे. विश्वचषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. भारतीय संघातील गोलंदाज आणि फलंदाज हे दोन्हीही मजबूत आहेत. त्यामुळे साऊथ आफ्रिकेविरुद्धचा सामना टीम इंडिया नक्कीच जिंकेल असा माझा विश्वास आहे. असे मत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केलं.

शोएबने या विश्लेषणादरम्यान टीम इंडियाचं फार कौतुक केलं आहे. “टीम इंडियाच्या फलंदाजीकडे पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, या टीममध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनसारखे सलामीचे फलंदाज आहेत. त्यानंतर टीम इंडियामध्ये विराट कोहलीसारखा जगातील उत्तम फलदांज आहेत. एवढं कमी की काय तर धोनी सारखा अनुभवी खेळाडू या टीममध्ये आहे.”

तसेच गोलंदाजाचा विचार केला तर, “टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, चहल यासारखे अनेक फिरकीपटू आहेत. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच नक्कीच जिंकेल असा माझा विश्वास आहे”, असं मत शोएब अख्तर या विश्लेषणादरम्यान व्यक्त केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *