‘National Sports Day’ Special : लहानपणापासूनच दिनचर्येत खेळ-व्यायामाची ठेवा सवय; जाणून घ्या, दिनचर्येत खेळाचा समावेश करण्याचे फायदे!

राष्ट्रीय क्रीडा दिन' विशेष निरोगी राहण्यासाठी, सर्व लोकांना शारीरिक हालचाली वाढविण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे अनेक रोग होण्याचा धोका कमी होतो. आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. हा विशेष दिवस दरवर्षी (ता 29 ऑगस्ट) रोजी साजरा केला जातो. जाणून घेऊया, रोज खेळाचे फायदे.

'National Sports Day' Special : लहानपणापासूनच दिनचर्येत खेळ-व्यायामाची ठेवा सवय; जाणून घ्या, दिनचर्येत खेळाचा समावेश करण्याचे फायदे!
Sports dayImage Credit source: google
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:04 PM

आज राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) साजरा केला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती देखील आहे. खेळ आपल्याला फक्त तंदुरुस्त राहण्यास मदत करत नाही तर अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून (From mental illness) आपले संरक्षण करतात. अभ्यास हे देखील दर्शविते की, जे लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये खेळ आणि व्यायामाचा समावेश करतात त्यांना इतर लोकांपेक्षा अनेक रोगांचा धोका (Risk of diseases) कमी असतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, प्रत्येकाने लहानपणापासूनच खेळाची सवय लावावी, कोणत्याही प्रकारच्या खेळाचा नित्यक्रमात समावेश करावा, ज्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायाम करता येईल. त्यासाठी क्रिकेट, टेनिस, धावणे, हॉकी, फुटबॉल आदी खेळांना जीवनशैलीचा भाग बनवता येईल. विशेषतः: मुलांना मैदानी खेळ घेण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. ते त्यांच्यातील लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास तसेच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यास उपयुक्त आहे. जाणून घेऊया मुलांसाठी नियमित मैदानी खेळ का आवश्यक आहेत, शरीरासाठी काय फायदे आहेत.

मुलांसाठी खेळांचे फायदे

अभ्यास दर्शविते की, कालांतराने, लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल सारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या मुलांमध्ये वाढत आहेत. ज्यासाठी बैठी जीवनशैली म्हणजेच शारीरिक निष्क्रियता हे मुख्य कारण म्हणून पाहिले जात आहे. या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे फायदेशीर ठरू शकते.मैदानी खेळांमध्ये शरीराला व्यायाम मिळतो, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. संशोधन असे सूचित करते की, जी मुले घरामध्ये वेळ घालवतात त्यांना आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

खेळण्याच्या सवयीचे काय फायदे आहेत?

मुलांमध्ये मैदानी खेळांची सवय त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.खेळामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. कार्डिओव्हस्कुलर फिटनेस वाढवण्यासाठी खेळ देखील उपयुक्त आहेत. हाडे, स्नायू आणि निरोगी शारीरिक विकासास मदत करते. उत्तम शारीरिक समन्वय आणि संतुलनासाठी खेळ आवश्यक आहेत. चांगली झोप, मानसिक आरोग्य लाभ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळ देखील विशेष भूमिका बजावतात असे मानले जाते. खेळ हे सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरतात.

संवादकौशल्य वाढतात

मैदानी खेळांमध्ये मुलांचा सहभागही त्यांना एकमेकांशी घट्ट नाते निर्माण करण्यास मदत करतो. खेळादरम्यान ते शिकतात की सामाजिक परिस्थितीत कसे वागावे, लोकांशी संबंध कसे निर्माण करावे? हा त्यांच्या मानसिक विकासाचा अविभाज्य भाग आहे. ज्या मुलांना मैदानी खेळांमध्ये फारसा रस नसतो त्यांना अनेकदा नवीन लोकांशी बोलण्यात संकोच आणि अस्वस्थता जाणवते.

खबरदारी देखील आवश्यक आहे

मुलांना खेळाकडे प्रवृत्त करणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खेळादरम्यान थोडीशी चूक झाल्यास दुखापत होऊ शकते. म्हणून जेव्हा जेव्हा मुलांना खेळासाठी पाठवले जाते तेव्हा गुडघे, कोपर आणि मनगट, तोंड इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे संरक्षणात्मक साहित्य घालावे. संरक्षणात्मक दृष्टिकोनातून खेळांना जीवनशैलीचा भाग कसा बनवता येईल, याबाबतही जनजागृती करणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.