AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना शाहरुख ना सलमान, सुशांत सिंह राजपूतच्या नावावर आहे अनोखा रेकॉर्ड, आजपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही

ना शाहरुख, ना सलमान खान, आजपर्यंत बॉलिवूडमधील कोणताच कलाकार सुशांत सिंह राजपूतचा हा रेकॉर्ड मोडू शकला नाही. कोणता आहे तो रेकॉर्ड?

ना शाहरुख ना सलमान, सुशांत सिंह राजपूतच्या नावावर आहे अनोखा रेकॉर्ड, आजपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही
| Updated on: May 19, 2026 | 3:57 PM
Share

Sushant Singh Rajput : बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि मेहनती अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सुशांत सिंह राजपूतने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. छोट्या पडद्यापासून सुरुवात करून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या सुशांतने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र, 14 जून 2020 रोजी त्याच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्यानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या मुद्द्यावर मोठी चर्चा रंगली होती.

आजही सुशांत सिंह राजपूतची आठवण चाहत्यांच्या मनात ताजी आहे. त्याच्या अभिनयाइतकाच त्याचा बुद्धिमान आणि अभ्यासू स्वभावही चर्चेत राहिला. विशेष म्हणजे त्याच्या नावावर असा एक खास विक्रम नोंदवला गेला आहे, जो आजपर्यंत बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही.

फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट

सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता ठरला, ज्याने अमेरिकन सुपरमॉडेल केंडल जेनर हिच्यासोबत एका आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. 2017 मध्ये प्रसिद्ध Vogue India मॅगझिनसाठी हे खास फोटोशूट करण्यात आलं होतं. त्या काळात या फोटोशूटची देशभरात मोठी चर्चा झाली होती.

हे ऐतिहासिक फोटोशूट राजस्थानमधील सामोदे पॅलेस येथे पार पडले होते. राजेशाही वातावरण आणि आलिशान लोकेशनमुळे या फोटोशूटला विशेष ग्लॅमर मिळालं होतं. जगप्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर मारिओ टेस्टिनो यांनी हे फोटोशूट आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. विशेष म्हणजे हे शूट ‘वोग इंडिया’च्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकासाठी करण्यात आलं होतं.

केंडल जेनरसोबत स्क्रीन शेअर करणारा बॉलिवूड अभिनेता

या आंतरराष्ट्रीय कव्हर शूटमध्ये सुशांत सिंह राजपूतने केंडल जेनर हिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती आणि हा मान मिळवणारा तो एकमेव भारतीय बॉलिवूड अभिनेता ठरला. त्यामुळे त्याच्या या यशाची आजही चर्चा केली जाते.

अभिनयासोबतच सुशांतला विज्ञान आणि खगोलशास्त्राची विशेष आवड होती. अंतराळ, ग्रह-तारे आणि विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर तो अभ्यास करत असत. त्याच्या या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळेही चाहते त्याच्यावर प्रेम करत होते. आजही सुशांत सिंह राजपूतचे चाहते त्याला विसरू शकलेले नाहीत. त्याच्या अभिनयासोबतच त्याची मेहनत, जिद्द आणि वेगळा विचार करण्याची पद्धत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?