NZ vs ENG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात दमदार खेळीसह अशी झाली, जॉनी बेयरस्टोला पायावर चेंडू टाकताच..
NZ vs ENG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना सुरु आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात काय काय घडामोडी घडतात? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्याने अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. कारण पाटा विकेटवर धावांचा डोंगर उभारण्याची संधी असताना न्यूझीलंडने गोलंदाजी स्वीकारली. आता इंग्लंड विजयसाठी किती धावांचं आव्हान देते आणि न्यूझीलंड हे आव्हान कसं पेलतं हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. पण इंग्लंडने या सामन्याची सुरुवात एकदम दमदार केली. जॉनी बेयरस्टोने षटकार मारत स्पर्धेला सुरुवात केली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहील असं तरी आता दिसत आहे.
न्यूझीलंडकडून पहिलं षटक ट्रेंट बोल्टला सोपवण्यात आलं. विकेटटेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अपेक्षेप्रमाणे पहिला चेंडू निर्धाव टाकला. पण दुसरा चेंडू पायाजवळ टाकताच जॉनी बेयरस्टोने षटकार ठोकला. तसेच या सामन्यासह स्पर्धेची सुरुवात षटकाराने केली. मागच्या वनर्ल्डकपमध्ये जॉनी बेयरस्टो दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. मात्र यावेळी त्याने षटकार ठोकला. पहिल्याच षटकात बिनबाद 12 धावा आल्या.
The first Six and Four of the World Cup 2023 belongs to Jonny Bairstow. #ENGvNZ pic.twitter.com/K8wRZyHGfA
— R A T N I S H (@LoyalSachinFan) October 5, 2023
दुसरं षटक मॅट हेन्री याच्याकडे सोपवण्यात आलं. त्याने अपेक्षित पहिल्याच चेंडूवर मलानला बीट केलं. तसेच एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. मात्र पंचांनी नाबाद दिल्याने रिव्ह्यू घेतला. अखेर तिसऱ्या पंचांनी नाबाद असल्याचं सांगितलं. यामुळे न्यूझीलंडने आपला रिव्ह्यूही गमावला. मॅट हॅन्रीने स्पर्धेतील पहिलं षटक निर्धाव टाकलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट
