फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीनंतर निरागसतेची अनुभूती, आरवने अनुभवला जादुई क्षण
फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्यासाठीची पात्रता फेरी आता अंतिम टप्प्यात आहे. कोणते संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतील याची उत्सुकता आहे. असाच एक सामना जर्मनी विरुद्ध लक्झेंबर्ग यांच्यात पार पडला.

जर्मनीने फुटबॉ़ल वर्ल्डकप पात्रता फेरी मोहिमेची सुरुवात निराशाजनक केल्यानंतर पुन्हा एकदा गाडी रुळावर आणली आहे. गेल्या महिन्यात स्लोवाकियाविरुद्धच्या पराभवामुळे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांच्यावर काहीसा दबाव आला होता. त्यानंतर जर्मनी विरुद्ध लक्झेंबर्ग हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात विजय मिळवल्याने मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांचा जीव भांड्यात पडला आहे. यजमान संघाने गट अ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.नेशन्स लीग रँकिंगमुळे जर्मनीला प्लेऑफमध्ये स्थान मिळणे आधीच निश्चित झाले आहे. कर्णधार जोशुआ किमिचने दोन गोल करून लक्झेंबर्गवर 4-0 असा सहज विजय मिळवला. हा सामना प्रेझेरो अरेना येथे पार पडला. जर्मनीने सुरुवातीपासूनच पाहुण्या संघाच्या गोलवर वर्चस्व गाजवले.12व्या मिनिटाला डेव्हिड रौमने गोल करून जर्मनीसाठी सुरुवात केली. फुटबॉल चाहत्यांच्या महासागराने इतिहास घडताना पाहिला. या सामन्यावेळी एक अत्यंत हळवा आणि वैयक्तिक प्रसंग घडला. आरव शर्मा नावाच्या जर्मनीत राहणाऱ्या भारतीय मुलासाठी हा दिवस खास ठरला.
आरवचा एक स्वप्न होतं की, फ्लोरियन व्हिर्ट्झला प्रत्यक्ष भेटायचं आणि ते स्वप्न या सामन्यानंतर सत्यात उतरलं. सामना संपल्यानंतर आरवची नजर फ्लोरियनवरच खिळली होती. कधी एकदा त्याला भेटतो असं झालं होतं. चाहत्यांचा गोंधळ आणि गर्दी पाहून थोडी फार निराशाही आली होती. पण आरवने मनाशी पक्कं ठरवलं होतं की काहीही करून भेट घ्यायची. आरव धाडस करून फ्लोरियनजवळ गेला. त्याला प्रत्यक्ष समोर असलेलं पाहून धडधडत्या हृदयाने सांगितलं की, “तू मला प्रेरणा देतोस.” फ्लोरियनने हसून त्याला दाद दिली आणि त्याचा हात घट्ट पकडला. प्रेमळ शब्दांत त्याला प्रोत्साहन दिलं. तसेच एकत्र फोटोही घेतला. आरवसाठी हा एक क्षण आय़ुष्यभर आपल्या मनाच्या तिजोरीत जपून ठेवणार यात काही शंका नाही.
त्या छोट्याशा क्षणात जणू काही विश्व थांबलं होतं. ही केवळ एक भेट नव्हती, तर एक अमूल्य क्षण होता. आरव शर्मा आणि फ्लोरियन व्हिर्ट्झ यांच्यात घडलेली एक आत्मिक भेट दोघांच्या हृदयात कायमची कोरली गेली. फुटबॉलच्या जगतात या आनंदाच्या लहरी दूरदूरपर्यंत पोहोचल्या. अशा क्षणांमुळे आठवण राहते की फुटबॉल म्हणजे केवळ खेळ नाही, तर ती एक भावना आहे. एक सेतू आहे जो निरागस स्वप्नं आणि खेळातील श्रेष्ठता यांच्यातील अंतर मिटवतो.
एक फुटबॉल तज्ज्ञ मी जे अनुभवलं ते अतिशय भावनिक होतं. आरवसारखा तरुण खेळाडू जेव्हा त्याच्या आदर्शाला भेटतो. तेव्हा ती केवळ एक व्यक्तिगत गोष्ट राहत नाही. ती लाखो मुलांसाठी प्रेरणादायी ठरते. फ्लोरियनसारख्या खेळाडूची उपस्थिती आणि त्याचा साधेपणा हे दाखवून देतात की फुटबॉल केवळ मैदानापुरता मर्यादित नाही. तो स्वप्नांना बळ देतो, आणि प्रेरणेला आकार देतो.
