Asian Games 2023 | चिराग-सात्विक जोडीची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

Asian Games Mens Badminton Doubles Final Chirag Shetty and Satwik Sairaj Clinch Golden Medal | टीम इंडियाची एशियन गेम्समध्ये पदकांची लयलूट सुरुच आहे. आता टीम इंडियाने मेन्स डबलमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे.

Asian Games 2023 | चिराग-सात्विक जोडीची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 3:59 PM

होंगझोऊ | चीनमधील होंगझोऊमध्ये एशियन गेम्स 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा धमाका सुरुच आहे. टीम इंडियाने आता आणखी गोल्ड मेडल जिंकला आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने बॅडमिंटन मेन्स डबल्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या दोघांनी भारताला पहिल्यांदाच बॅडमिंटन या खेळात गोल्ड मेडल मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. चिराग-सात्विक या दोघांनी दक्षिण कोरियाच्या चोई सोल आणि किम वोंग या जोडीवर 21-18 आणि 21-16 अशा फरकाने मात केली. चिराग आणि सात्विक या दोघांचं आता सर्वत स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

टीम इंडियाच्या चिराग आणि सात्विक या दोघांना गोल्ड मेडलसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. चिराग आणि सात्विक ही जोडी खेळात मागे पडली. मात्र त्यानंतर या दोघांनी जोरदार मुसंडी मारत 13-13 अशी बरोबरी साधली. त्यानंतर चिराग आणि सात्विक या दोघांनी तडाखेदार कामगिरी केली. या दोघांनी पहिला सेट आपल्या नावावर केला. टीम इंडियाने 21-18 अशा 3 पॉइंट्सच्या फरकाने सेट खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये काय झालं?

टीम इंडियाच्या या जोडीने दुसऱ्या सेटमध्येही शानदार कामगिरी सुरुच ठेवली. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियाच्या जोडीने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात काही पॉइंट्सही मिळवले. मात्र टीम इंडियाच्या चिराग आणि सात्विक या दोघांनी नियंत्रण मिळवत आघाडी कायम राखली. टीम इंडियाने दुसरा सेट हा 5 पॉइंट्सच्या फरकाने 21-16 असा जिंकला आणि सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.

टीम इंडियाचं बॅडमिंटनमधील पहिलवहिलं ऐतिहासिक सुवर्ण

दरम्यान चिराग आणि सात्विक या जोडीने चोई सोल आणि किम वोंग या दक्षिण कोरियाच्या जोडीला चितपट केलं होतं. मलेशिया ओपनमध्ये टीम इंडियाच्या या जोडीने कोरियाच्या या जोडीचा 21-16 आणि 21-13 पराभूत केलं होतं. तर त्याआधी फ्रेंच ओपन 2022 स्पर्धेतील उपांत्य फेरीत 21-18 आणि 21-14 च्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.