SA vs SL CWC 2023 | श्रीलंकाने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हमध्ये कोण?

South Africa vs Sri Lanka Icc World Cup 2023 Match Toss | वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर शनिवार आहे. आज एकूण 2 सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आहे. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत.

SA vs SL CWC 2023 | श्रीलंकाने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हमध्ये कोण?
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 2:07 PM

नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला डबल हेडर आज शनिवार 7 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येत आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात आशियामधील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका एकमेकांसमोर आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन दासून शनाका याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

दोन्ही संघांचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही टीमचा दमदार कामगिरी करुन विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या प्रयत्नात दोघांपैकी नक्की कोणती टीम यशस्वी ठरते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. दक्षिण आफ्रिका टीमने गेल्या 3 दशकात वर्ल्ड कपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत 4 वेळा सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र चार पैकी एकही वेळा दक्षिण आफ्रिकेला फायनलपर्यंत पोहचण्यात यश आलेलं नाही.

वर्ल्ड कपमधील हेड टु हेड टु रेकॉर्ड

दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका हे दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामन्यांमध्ये भिडले आहे. या 6 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी मैदान मारलं आहे. दक्षिण आफ्रिका टीमने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 1 सामना हा टाय राहिला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून विजयी ‘पंच’ देतं की श्रीलंका आकडे सुधारते हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीप), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका आणि कसून राजिथा.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.