बॉक्सिंगच्या रिंगमधील रितूवर पार्किंगमध्ये काम करण्याची वेळ, वडिलांच्या आजारपणामुळे सोडावी लागली बॉक्सिंग

अवघ्या 23 वर्षांच्या या महिला बॉक्सरला कुटुंबाच्या परिस्थितीमुळे 2017 मध्ये बॉक्सिंग सोडावी लागली. पण आजही तिला बॉक्सिंग खेळतानाचे दिवस आठवतात.

बॉक्सिंगच्या रिंगमधील रितूवर पार्किंगमध्ये काम करण्याची वेळ, वडिलांच्या आजारपणामुळे सोडावी लागली बॉक्सिंग
एकेकाळी बॉक्सिंगच्या रिंगमधील रितू आता पार्किंगमध्ये काम करत आहे.
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 6:40 PM

चंदीगड : ज्याप्रकारे मेहनतीने एखादं स्वप्न पूर्ण होतं. त्याउलट गरीबीमुळे अनेकांची स्वप्न अपूर्ण देखील राहतात. याचच एक ताजं उदाहरण आहे चंदीगडमधील रितूचं. घरच्या परिस्थितीमुळे आपल्या आवडत्या बॉक्सिंग खेळाशी नातं तोडावं लागलेल्या 23 वर्षीय रितूची कहानी खरचं दुर्देवी आहे. एकेकाळी बॉक्सिंग रिंगमध्ये खेळणारी रितू आता शास्त्री मार्केटच्या पार्किंगमध्ये एक पार्किंग अटेडंट म्हणून काम करते आहे.

रितु स्कूल नॅशनल्समध्ये कांस्य पदक विजेती बॉक्सर आहे. याशिवाय इंटर स्कूल टूर्नामेंटमध्ये देखील तिने पदक जिंकलं होतं. पण 2017  मध्ये तिला खाजगी कारणांमुळे खेळाशी नातं तोडाव लागलं. एकेकाळी मोेठी बॉक्सर होऊन देशाचं नाव मोठं करु इच्छिनारी रितू आता  पार्किंग अटेंडंट म्हणून दिवसाचे 350 रुपये कमवून जीवनाचा गाडा हाकत आहे.

वडिलांच्या आजाराने तोडलं बॉक्सिंगच स्वप्न

शालेय जीवनातच रितू योग्यप्रकारे आपल्या खेळामध्ये पुढे जात होती. बॉक्सिंग रिंगमध्ये तिची कमाल दिसू लागली होती.  पण त्याच दरम्यान तिचे वडिल आजारी पडले. ज्यामुळे घरावर आर्थिक संकट आलं. त्यामुळे रितूला खेळ सोडून पैसे कमवण्यासाठी काम करायला सुरुवात करावी लागली. रितूने एएनआयशी बोलताना सांगितल,“मी जेव्हा 10 वीला होते. तेव्हा मला बॉक्सिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर मी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर काही स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. मी वॉलीबॉल आणि कुस्तीतही राष्ट्रीय स्तरावर खेळले आहे. पण नंतर माझे वडिल आजारी पडले. त्यांनी काम सोडून दिलं. त्यामुळे मला घराला हातभार देण्यासाठी काम करण्यास सुरुवात करावी लागली. मी माझ्या क्रिडा शिक्षकांना मदत मागितली होती. पण वरुन कोणतीच मदत मिळाली नाही. मला स्पोर्ट्स कोट्यातून स्कॉलरशिप किंवा नोकरी काहीच मिळाली नाही. ज्यामुळे अखेर मला बॉक्सिंग सोडावी लागली.”

आजही आठवतात ‘ती’ तीन वर्ष

रितू सेक्टर 20-बीमधील सरकारी शाळेत शिकायची. 2015 साली तिचे पीटी शिक्षक परमजीत सिंग यांच्या सांगण्यावरुन तिने बॉक्सिंग सुरु केली. ती शाळेत कुस्तीही खेळायची. तिने 63 किलोग्राम वजनी गटात इंटर-स्कूल टूर्नामेंटमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यासोबतच 63 किलोग्राम वजनी गटात स्कूल नॅशनल्समध्ये तिने बॉक्सिंगमध्येही कमाल करत कांस्य पदक मिळवलं होतं.  इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या रितूच्या प्रतिक्रियेत तिने सांगितले की, “मी जे काही खेळू शकली ती शाळेतील तीन वर्षांतच खेळू शकली. 2017 मध्ये मला शाळा सोडावी लागली. त्यानंतर मला पुन्हा खेळायला मिळाले नाही. पण शाळेतील ते सुवर्णक्षण आठवणींच्या रुपात अजूनही माझ्याकडे आहेत. तेव्हा मला मदत मिळाली असती तर मी आजही खेळत असते. मला भारतीय बॉक्सिंग असोसिएशनद्वारा आयोजित नॅशनल्स स्पर्धेत प्रशिक्षक आणि योग्य सराव नसल्यामुळे खेळता आलं नव्हतं.”

इतर बातम्या

भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर मजुरी करण्याची वेळ

हॉकीला अधिकृतरित्या राष्ट्रीय खेळ घोषित करण्याची मागणी, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

(chandigarhs national level boxer ritu working as parking attendant)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.