US Open 2021 च्या महिला गटात एमा राडुकानू विजयी, स्पर्धा जिंकत नवा विक्रमही केला नावे

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फेरीत डेनिल मेदवेदेवने नोव्हाक जोकोव्हिचला नमवत विजय मिळवला आहे. तर महिला गटात एमा राडुकानूने लेयलाह फर्नांडेजला मात देत विजय आपल्या नावे केला आहे.

US Open 2021 च्या महिला गटात एमा राडुकानू विजयी, स्पर्धा जिंकत नवा विक्रमही केला नावे
एमा राडुकानू
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 4:33 PM

US open 2021: टेनिस जगतातील मानाची स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत (US Open Tennis Tournament) पुरुष गटात लागलेल्या धक्कादायक निर्णयानंतर महिला गटातही नवी चॅम्पियन जगाला मिळाली आहे. पुरुषांमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा आणि  सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला (Novak Djokovic) रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने (daniil medvedev) नमवत पहिलं ग्रँडस्लॅम मिळवलं. तर महिलांमध्ये ब्रिटनच्या एमा राडुकानूने (emma raducanu) कॅनडाच्या लेयलाह फर्नांडेजला (Leylah Annie Fernandez) मात देत पहिलंच ग्रँडस्लॅम पटकावलं. त्यामुळे यंदा अमेरिकन ओपनमध्ये विजयी होणाऱ्या दोन्ही खेळाडूंच पहिलंच ग्रँड स्लॅम आहे.

पण एमासाठी हे ग्रँडस्लॅम असून खास आहे. कारण तिने या विजयासह एक नवा विक्रमही नावे केला आहे. राडुकानूने या जेतेपदासह ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी युवा खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी मारीया शारापोव्हाने वयाच्या 17व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता एमाने 18 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे.

असा झाला सामना

जवळपास दोन तास चाललेल्या या सामन्यात राडुकानूने फर्नांडेजला 6-4 6-3 च्या सरळ सेट्समध्ये मात दिली. तिने केलेल्या या अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात तिचं कौतुक होत आहे. विजयापूर्वी एमा ही रँकिंगमध्ये 150 व्या स्थानावर होती. इतक्या खालच्या स्थानावर असतानाही तिने ही कामगिरी करुन दाखवली आहे. या विजयामुळे एमाच्या रँकिंगमध्ये बराच फरक पडणार आहे हे नक्की!

‘महिला टेनिसचं भविष्य उज्वल’

विजयानंतर एमाने बोलताना म्हणाली, ”मला वाटतं सध्याची महिला टेनिसची परिस्थिती आणि भविष्य फार सुंदर आहे. प्रत्येक महिला खेळाडू जी अशा मोठ्या स्पर्धेत ड्रॉ फेरीपर्यंत पोहचते. ती कोणतीही स्पर्धा जिंकू शकते. मला आशा आहे की भविष्यात अनेक महान महिला खेळाडू जगासमोर येणार आहेत.”

इतर बातम्या

टेनिससाठी सोडलं शिक्षण, 21 वर्षाच्या वयात जगातील तिसऱ्या क्रमांकावर विजय, आता जिंकला सर्वात मोठा खिताब

Novak Djokovic इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला?, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला हुलकावणी, डॅनिल मेदवेदेव विजयी

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

(Emma raducanu won first grand slam by beating leylah fernandez in US open became second youngest player to achieve this)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.