AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swapnil Kusale: “वेड लागल्याशिवाय….”, स्वप्निलच्या ऐतिहासिक विजयानंतर Insta Bio व्हायरल

Swapnil Kusale Instagram Bio Viral: स्वपनिल कुसाळे याने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण आणि नेमबाजीतील तिसरं पदक मिळवून दिलं. त्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम बायोची एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

Swapnil Kusale: वेड लागल्याशिवाय...., स्वप्निलच्या ऐतिहासिक विजयानंतर Insta Bio व्हायरल
Swapnil Kusale bronze medal paris olympics 2024Image Credit source: OlympicKhel X Account
| Updated on: Aug 01, 2024 | 6:47 PM
Share

मध्य रेल्वेत टीसी पदावर कार्यरत असणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. स्वप्निलने भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला 50मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवून दिलं. भारताचं हे या स्पर्धेतील आणि नेमबाजीतील एकूण तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्निल या प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा पहिलाच नेमबाज ठराला आहे. तसेच स्वप्निल ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर आता तब्बल 72 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वप्निलने ही कामगिरी केली आहे. स्वप्निलच्या या कामगिरीनंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील एक वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

स्वप्निलचं या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री या तिघांनी स्वप्निलंच अभिनंदन केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांशी संपर्क करत हवं ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सोशल मीडियावर स्वप्निलच्या इंस्टाग्राम बायोमधील ते एक वाक्य व्हायरल झालं आहे. “वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही”, असं वाक्य स्वप्निलच्या इंस्टा बायोमध्ये आहे. आता हे वाक्य स्वप्निलच्या विजयानंतर व्हायरल झालं आहे.

स्वप्निल कुसाळे याचं इंस्टाग्राम बायोमधील वाक्य

भारताला तिसरं कांस्य पदक

दरम्यान भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 3 पदकं मिळवली आहेत. स्वप्निलआधी भारताला सरबज्योत सिंह आणि मनु भाकर या दोघांनी भारताला पदकं मिळवून दिली. मनु भाकर हीने भारताचं खातं उघडलं. त्यानंतर मिश्र दुहेरी या प्रकारात मनु आणि सरबज्योतने भारताला दुसरं पदक मिळवून दिलं.

1 कोटींचं बक्षिस जाहीर

दरम्यान स्वप्निल कुसाळे याला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसेच तो परतल्यावर त्याचा सत्कार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस म्हटलं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.