महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार, शरद पवारांचं दिपाली सय्यद यांना आश्वासन

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार, शरद पवारांचं दिपाली सय्यद यांना आश्वासन

मुंबई: कुस्तीपटूंच्या विविध समस्यांसंदर्भात सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद (Dipali Sayyed) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेऊन दिपाली भोसले सय्यद यांनी कुस्तीपटूंना (wrestling) भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कोरोनामुळे कुस्तीपटूंचे होत असलेले नुकसान व अन्य गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. रखडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 23, 2022 | 1:51 PM

मुंबई: कुस्तीपटूंच्या विविध समस्यांसंदर्भात सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद (Dipali Sayyed) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेऊन दिपाली भोसले सय्यद यांनी कुस्तीपटूंना (wrestling) भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कोरोनामुळे कुस्तीपटूंचे होत असलेले नुकसान व अन्य गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. रखडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.

याप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी व महापौर केसरी पैलवान अमृत मामा भोसले उपस्थित होते. त्यांनी कुस्तीगीरांच्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. पवारांनी लगेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांना फोन केला व दोन दिवसात निर्णय घेण्यासाठी शासन पातळीवरून हालचाली होतील, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद भोसले कुस्ती गिरी फाऊंडेशनचे सर्व कार्यकारणी व महाराष्ट्र केसरी व आंतराष्ट्रीय महिला कुस्तीपटु उपस्थित होत्या

Maharashtra Kesari wrestling tournament Actress Dipali Sayyed meet ncp supremo sharad pawar

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें