AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. तसं संघांची राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे, स्टार फुटबॉलपटू मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यातील लढत चुरशीची होताना दिसत आहे.

Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावर
Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावरImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 23, 2026 | 6:20 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आता रंगतदार लढती होताना दिसत आहे. प्रत्येक गटात राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्याची चुरस सुरू झाली आहे. आतापर्यंत जर्मनी, अमेरिका, मेक्सिको आणि अर्जेंटिना या संघांनी राउंड 32 मध्ये एन्ट्री मारली आहे. असं असताना दुसरीकडे, या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटूंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. स्टार फुटबॉलपटून लियोनल मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यात थेट लढत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल कोण मारणार? अशी ही लढत आहे. फ्रान्सच्या एम्बाप्पेने आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीतील 100व्या सामन्यात इराकविरुद्ध 2 गोल मारले. या गोलसह त्याने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या गोल विक्रमाला आव्हान दिलं आहे. एम्बाप्पेने दोन गोल मारत त्याच्या जवळ पोहोचला आहे. मेस्सीपासून फक्त 2 गोल दूर आहे. इतकंच काय तर गोल्डन बूटच्या शर्यतीतही या दोन खेळाडूंमध्ये चढाओढ आहे.

एम्बाप्पेमुळे मेस्सीचा विक्रम संकटात!

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 18 गोल मारण्याचा विक्रम लियोनल मेस्सीच्या नावावर आहे. पण फ्रान्स इराक सामना पार पडल्यानंतर मेस्सीच्या गोल विक्रम संकटात आला आहे. फ्रान्सने इराकला 3-0 ने पराभूत केलं. यात दोन गोल एम्बाप्पेने मारले आणि त्याच्या नावावर एकूण 16 गोल झाले. त्याने जर्मनीच्या मिरास्लोव क्लोजच्या 16 गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. आता त्यापुढे फक्त मेस्सी असून त्याने 18 गोल मारले आहेत. म्हणजेच त्याची बरोबरी करण्यासाठी फक्त 2 गोल हवे आहेत. एम्बाप्पेला दोन गोल मारणं काही कठीण दिसत नाही. इतकंच काय तर त्याच्या पुढेही निघून जाऊ शकतो. त्यामुळे फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम एम्बाप्पेच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. मेस्सीचं वय 38 असून शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर एम्बाप्पे 27 वर्षांचा असून त्याच्याकडू अजून संधी आहे.

गोल्डन बूटसाठी थेट लढत

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत गोल्डन बूटसाठी अर्जेंटिनाचा मेस्सी आणि फ्रान्सचा एम्बाप्पे यांच्यात थेट लढत आहे. मेस्सीने या स्पर्धेत अद्याप 5 गोल मारले असून शर्यतीत आघाडीवर आहे. पण येथेही त्याला फ्रान्सच्या एम्बाप्पेचं आव्हान आहे. गोल्डन बूटच्या शर्यतीत 4 गोलसह एम्बाप्पे दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात ही लढत आणखी चुरशीची होणार आहे.

Follow Us
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ
मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची
Omraje Nimbalkar | तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची मोठी भूमिका; थेट दंड थोपटले!