AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?

IND vs PAK T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानने ठरवलय की भारताविरुद्ध खेळायचं नाही. 15 फेब्रुवारीला कोलंबो मध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार आहे. पाकिस्तानी टीम भारताविरुद्ध खेळणार नाहीय, तरीही टीम इंडिया कोलंबोमध्ये का जाणार? कारण काय?

IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही  टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 11:02 AM
Share

IND vs PAK, T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने कालच घोषणा केली की, वर्ल्ड कपमध्ये त्यांची टीम भारताविरुद्ध मॅच खेळणार नाही. 15 तारखेला कोलंबोत भारत-पाकिस्तान सामना होणार होता. पाकिस्तान टीम श्रीलंकेत त्यांचे उर्वरित सामने खेळेल. पण भारताविरुद्ध खेळणार नाही. याचा अर्थ असा आहे की, टीम इंडियाला वॉकओवर मिळेल. भारताच्या खात्यात न खेळताच 2 पॉइंट जमा होतील. पाकिस्तानने जाहीर केलय की, ते भारताविरुद्ध खेळणार नाहीत. पण टीम इंडिया या सामन्यासाठी श्रीलंकेला नक्की जाणार.

पाकिस्तानने भले भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असेल. पण टुर्नामेंट दरम्यान टीम इंडिया आयसीसीचे प्रोटोकॉल फॉलो करेल. आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार टीम इंडिया या मॅचसाठी श्रीलंकेला जाईल. रिपोर्ट्सनुसार भारतीय टीम 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत दाखल होईल. टीम तिथे ठरलेल्या शेड्युलनुसार प्रॅक्टिस करेल. प्रेस कॉन्फरन्सही करणार आणि मॅचच्यावेळी स्टेडियममध्ये सुद्धा जाणार. पाकिस्तानी टीम मैदानावर उतरली नाही, तर मॅच रेफरी मॅच रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करतील. भारतीय टीम या संपूर्ण प्रोसेसची प्रतिक्षा करेल आणि वॉकओवर मिळाल्यानंतर मैदानातून काढता पाय घेईल.

याला मॅच फॉरफिट मानलं जातं

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेने संयुक्तरित्या आयोजित केला आहे. भारताचे बहुतांश सामने भारतात तर पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तानने राजकीय कारणांमुळे भारतात खेळायला नकार दिला आहे. आयसीसीने त्यांचे सामने न्यूट्रल वेन्यूवर शिफ्ट केले. भारत-पाकिस्तान सामना कोलंबोच्या प्रेमदासा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानचा बहिष्काराचा निर्णय एकतर्फी आहे. याला मॅच फॉरफिट मानलं जातं. भारताला 2 पॉइंट मिळणं निश्चित आहे.

आपसात मिळून काही तोडगा काढा

पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आयसीसीचं स्टेटमेंट सुद्धा समोर आलं आहे. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या निर्णयावर फेरविचार करण्यास आणि आपसात मिळून काही तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सूचनेची आम्ही वाट पाहतोय. आयसीसी टुर्नामेंट स्पोर्टिंग प्रामाणिकता, कॉम्पिटिशन आणि निष्पक्षतेवर आधारित असते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...