AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारताचा जावई होणार

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय तरुणीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दुबई-स्थित शामिया आरझूसोबत लगीनगाठ बांधणार असल्याची कबुली खुद्द हसनने दिली. येत्या 20 ऑगस्टला दुबईमध्ये हसन आणि शामिया यांचा निकाह होणार आहे. शामिया ही एमिरेट्स एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर तिचे कुटुंबीय भारतात दिल्लीमध्ये राहतात. हा विवाह सोहळा […]

पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारताचा जावई होणार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 03, 2019 | 11:00 AM
Share

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय तरुणीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दुबई-स्थित शामिया आरझूसोबत लगीनगाठ बांधणार असल्याची कबुली खुद्द हसनने दिली.

येत्या 20 ऑगस्टला दुबईमध्ये हसन आणि शामिया यांचा निकाह होणार आहे. शामिया ही एमिरेट्स एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर तिचे कुटुंबीय भारतात दिल्लीमध्ये राहतात.

हा विवाह सोहळा खाजगी स्वरुपाचा असावा, अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र मीडियामध्ये याबाबत चर्चा रंगू लागल्यामुळे अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय मी घेतला, असं हसनने सांगितलं.

पाकिस्तानात होणार निकाह

पाकिस्तानातील गुजरनवाला शहरात हसन आणि शामिया लग्नानंतर राहणार आहेत. 20 ऑगस्टला विवाह झाल्यानंतर तीन महिन्यांनी रुखसाती (रिसेप्शन) होईल, अशी माहिती हसनने दिली.

हरियाणातील मानव रचना विद्यापीठातून शामियाने एअरोनॉटिक्स विषयात पदवी मिळवली आहे. इंग्लंडमध्ये तिने उच्चशिक्षण घेतलं होतं.

शामियाचा भारतीय पोशाख

लग्नात शामिया भारतीय पद्धतीचा पोशाख करणार आहे, तर आपण काळ्या आणि लाल रंगाची शेरवानी घालणार असल्याचं हसन म्हणाला.

हसन आणि शामिया यांची ओळख वर्षभरापूर्वी दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. हसनने तिला लग्नाची मागणी घातली. तिच्या होकारानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह सोहळा निश्चित झाला.

भारताचा जावई होणारा चौथा क्रिकेटपटू

हसन अली हा भारताचा जावई होणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार झहीर अब्बास (पत्नी सामिना अब्बास), मोहसीन खान (पत्नी – भारतीय अभिनेत्री रिना रॉय) आणि शोएब मलिक (पत्नी – भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा) हे भारताचे जावई होते.

Follow Us
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं