Pakistan PM : भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे पंतप्रधान खूश, इरफान पठाणने दिलं सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटच्या माध्यमातून टोमणा मारला होता.

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) सेमीफायनलमध्ये (Semifinal) पराभव झाल्यापासून पाकिस्तानचे (PAK) चाहते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ अधिक खूश झाले आहेत. टीम इंडिया फायनलमध्ये यावी अशी अनेक माजी खेळाडूंची इच्छा होती. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला आहे.
ज्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटच्या माध्यमातून टोमणा मारला होता. त्याला टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने ‘तुमच्या देशावर लक्ष केंद्रित करा’असं उत्तर दिलं आहे.
“तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही स्वतःच्या देशात आनंदी आहोत आणि तुम्ही इतरांच्या त्रासात आहात. त्यामुळेच आपला देश सुधारण्याकडे लक्ष नाही.” असं उत्तरं इरफान पठाणने ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.
इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कॅरेन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि नसीम शाह
