Asia Cup Trophy : ट्रॉफी न दिल्याने मोहसीन नक्वीला मिळणार भयंकर शिक्षा, आयुष्यात कधीच केला नव्हता विचार असा फटका बसणार!
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसीन नक्वी याला मोठी शिक्षा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याने भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी दिलेली नाही. ही ट्रॉफी घेऊन तो निघून गेला होता.

Asia Cup 2025 Trophy : आशिय चषक स्पर्धा 2025 संपून साधारण दोन आठवडे झाले. मात्र अजूनही या स्पर्धेचा वाद संपलेला नाही. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. पाकिस्तानचा पराभव झाला. भारताचा विजय होऊनदेखील भारताला या स्पर्देच्या जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाहीये. असे असतानाच भारताला ट्रॉफीपासून वंचित ठेवणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेचा तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसीन नक्वी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयसीसी आता नक्वी याच्याविरोधात लवकरच कठोर कारवाई करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नक्वीचे अध्यक्षपद थेट धोक्यात
मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात आयसीसीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला मोहसीन नक्वीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने पीसीबीचा अध्यक्ष नक्वी याच्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई कशी केली जाईल? यासाठी सर्व पर्यायांचा अभ्यास केला आहे. नक्वीने केलेल्या कृत्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसेच आयसीसीआयदेखील नक्वीविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. नक्वी याचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपददेखील धोक्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे.
नक्वीने काय दिला होता आदेश?
वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार आशिया चषक 2025 स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी अजूनही दुबईतच आहे. ही आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे. ही ट्रॉफी दुसरीकडे कुठेही गेली नाही पाहिजे. सोबतच मी वैयक्तिकरित्या जोपर्यंत उपस्थित नसेल, तोपर्यंत ही ट्रॉफी कोणालाही देऊ नये, असा आदेश नक्वी याने दिलेला आहे. मी स्वत: ही ट्रॉफी देईल, अशी मोहसीन नक्वी याची भूमिका आहे. मोहसीन नक्वी हा एसीसी, पीसीचा प्रमुख आहे. सोबतच तो पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहे. ज्या व्यक्तीने भारताविरोधात गरळ ओकलेली आहे, त्याच्याकडून आम्ही ट्रॉफी घेणार नाही, अशी भूमिका भारतीय संघाने घेतली होती. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन बराच काळ उभा होता. शेवटी भारतीय संघ ट्रॉफी घेण्यास न आल्याने नक्वी याने ती स्वत:सोबत नेली होती. भारताला ही ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही.
