जेव्हा पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पंजाब विरुद्ध राजस्थान सामना थांबवला...

हैदराबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला, पण राजस्थानचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने त्याचं या मोसमातील पहिलं शतक ठोकलं. संजूने याअगोदरही एकदा शतक ठोकलेलं आहे. या सामन्याची चर्चा एका कारणामुळे जास्त झाली आणि ते म्हणजे एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयमुळे सामना थांबवावा …

pizza delivery boy, जेव्हा पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पंजाब विरुद्ध राजस्थान सामना थांबवला…

हैदराबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला, पण राजस्थानचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने त्याचं या मोसमातील पहिलं शतक ठोकलं. संजूने याअगोदरही एकदा शतक ठोकलेलं आहे. या सामन्याची चर्चा एका कारणामुळे जास्त झाली आणि ते म्हणजे एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयमुळे सामना थांबवावा लागला.

विजय शंकरच्या गोलंदाजीवर 12 व्या षटकात संजू सॅमसन गोलंदाजी करत होता. शंकर त्याच्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी धाव घेत असतानाच संजूने त्याला थांबण्याची विनंती केली. संजू खेळपट्टीवरुन बाजूला झाल्यानंतर कॅमेरा जेव्हा फिरवण्यात आला, तेव्हा संजूने कशामुळे गोलंदाजाला थांबवलं ते समजलं.

पिझ्झा डिलिव्हरी बॉय प्रेक्षकांसाठी डिलिव्हरी घेऊन आला होता आणि याच लाईनने संजूचं लक्ष विचलित केलं. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिझ्झा बॉय काही सेकंदातच तिथून निघून गेला आणि सामना पुन्हा सुरु करण्यात आला. पण काही सेकंदासाठी का होईना सर्वांचं लक्ष या पिझ्झा बॉयने वेधून घेतलं.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *