IND vs ENG 3rd Test :इतिहास बदलण्यासाठी मोटेरा सज्ज, राष्ट्रपतींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या मैदानाचं उद्घाटन

India vs England 3rd Test today : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) सरदार पटेल स्टेडियमचं (मोटेरा ) उद्घाटन करणार आहेत.

IND vs ENG 3rd Test :इतिहास बदलण्यासाठी मोटेरा सज्ज, राष्ट्रपतींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या मैदानाचं उद्घाटन
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:23 AM

अहमदाबाद: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd Test) आज ( 24 फेब्रुवारी )पासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन करणार आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मोटेरा स्टेडियमवर उपस्थित राहतील. प्रेक्षकसंख्येचा विचार करता मोटेरा जगातील सर्वात मोठं ग्राऊंड ठरणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षक क्षमता सर्वाधिक होती. (India vs England 3rd Test today President Ramanth Kovind to inaugurate world largest cricket stadium at Ahmedabad)

1 लाख 10 हजार प्रेक्षकक्षमता

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या तिसरी कसोटी आजपासून मोटेरा ग्राऊंडवर होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या मैदानांचं उद्घाटन करतील. अहमदाबादमधील साबरमती येथील सरदार पटेल स्टेडियम मोटेरा या नावानं ओळखलं जाते. मोटेराच्या मैदानावर 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर 90 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.

मोटेराच्या मैदानाचा विस्तार 63 एकरांवर असून आधनिक सुविधांच्या निर्मितीसाठी 800 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे 55 हजार तिकीटांची विक्री करण्यात आले. या मैदानात 11 सेंटर पिच असून ती लाल आणि काळ्या मातीनं तयार करण्यात आली आहेत. मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी मैदानाची पाहणी केली.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना (Pink Ball Test)

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd Test) 24 फेब्रुवारीपासून (उद्या) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. ही मॅच गुलाबी चेंडूने खळण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात दुसऱ्या कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयने मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे.

अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया (17 सदस्यीस संघ)

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

नेट गोलंदाज | संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार, अंकित राजपूत आणि आवेश खान.

रिझर्व्ह प्लेअर्स | केएस भरत आणि राहुल चाहर.

संबंधित बातम्या:

IND vs ENG 3rd Test Playing XI : बुमराह-पंड्या पुनरागमनासाठी सज्ज, Pink Ball test साठी संघात बदल होणार?

India vs England 3rd Test today President Ramanth Kovind to inaugurate world largest cricket stadium at Ahmedabad

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.