Preview : नागपूर वन डेत कुणाला संधी, कुणाला डच्चू?

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहा विकेट्सने मिळालेल्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचा दुसरा सामना नागपुरात होतोय. विश्वचषकासाठी दावेदारी मजबूत करण्याची सर्वच खेळाडूंकडे ही महत्त्वाची संधी आहे. अगोदर टी-20 मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाने हैदराबाद वन डेतून पुन्हा एकदा विजयी सुरुवात केली. आता विश्वचषकापूर्वी केवळ चार वन डे सामने उरले आहेत. त्यामुळे […]

Preview : नागपूर वन डेत कुणाला संधी, कुणाला डच्चू?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहा विकेट्सने मिळालेल्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचा दुसरा सामना नागपुरात होतोय. विश्वचषकासाठी दावेदारी मजबूत करण्याची सर्वच खेळाडूंकडे ही महत्त्वाची संधी आहे. अगोदर टी-20 मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाने हैदराबाद वन डेतून पुन्हा एकदा विजयी सुरुवात केली. आता विश्वचषकापूर्वी केवळ चार वन डे सामने उरले आहेत. त्यामुळे परफेक्ट संघ निवडण्याचं आव्हान संघ व्यवस्थापनासमोर आहे.

पहिल्या वन डेत सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला होता. त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. सलामीसाठी पर्याय म्हणून लोकेश राहुल सध्या बसून आहे. पण त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रोहित शर्मा कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी सक्षम असल्याने त्याला वगळलं जाऊ शकत नाही. शिवाय कर्णधार विराट कोहलीसोबत रोहितचं कॉम्बिनेशन चांगलं असल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या कोहलीला याचा फायदा होतो. ही जोडी टिकल्यास ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील यात शंका नाही.

मधली फळी ही भारतासाठी नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. अंबाती रायुडू सध्या फार चांगली कामगिरी करत नसला तरी संघ व्यवस्थापनाकडून त्याच्यावर वारंवार विश्वास टाकला जात आहे. कारण, त्याच्या आत्मविश्वासाच्या बळावर त्याला संधी मिळत आहे. याशिवाय केदार जाधवने पहिल्या वन डेत 81 धावांची विजयी खेळी केली होती. सहाव्या क्रमांकावर त्याने स्थान निश्चित केलं आहे. धोनीनंतर केदार जाधवच्या रुपाने भारताला आणखी एक फिनिशर मिळालाय.

धोनी गेल्या काही दिवसांपासून चांगलाच फॉर्मात आहे. प्रत्येक संधीचा तो फायदा घेत आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या जागी रिषभ पंतला संधी मिळू शकते. पहिल्या वन डेत त्याला गोलंदाजीतून फार कमाल दाखवता आली नव्हती.

जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्या नेतृत्त्वात भारतीय गोलंदाजांचं आक्रमण तयार आहे. एकीकडे फलंदाजांना जाळ्यात ओढणारा कुलदीप यादव आहे, तर त्याला साध देण्यासाठी रवींद्र जाडेजा किंवा यजुवेंद्र चहल हा पर्याय आहे. जाडेजाला पहिल्या वन डेत एकही विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे चहलला दुसऱ्या वन डेसाठी संधी दिली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असेल.

संभावित संघ

भारत :

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा

ऑस्ट्रेलिया :

अॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शार्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉईनिस, उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी, पीटर हँड्सकोंब, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, जेसन बेहरेनडोर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, एंड्रयू टाय, नाथन कोल्टर नाईल आणि नाथन लायन

Non Stop LIVE Update
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.