AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

Punit Balan : अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी सभेत या निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड
Punit Balan kabaddiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 03, 2026 | 6:24 PM
Share

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी सभेत या निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रची वार्षिक सभा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे पार पडली. सपना वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सभेत संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेला अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनविण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारमंथन झाले. याच पार्श्वभूमीवर अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून पुण्यातील युवा उद्योजक तसेच पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

पुनीत बालन हे महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व असून विविध क्रीडा स्पर्धा, लीग आणि युवक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे क्रीडा व्यवस्थापनातील त्यांची समज अधिक भक्कम मानली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कबड्डी खेळाला अधिक संघटित, पारदर्शक आणि व्यावसायिक दिशा मिळेल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पुनीत बालन म्हणाले, “अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रने कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे मनःपूर्वक आभार. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ असून त्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अधिक बळकटी देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आगामी काळात पारदर्शकता, व्यावसायिक नियोजन आणि नव्या संधींच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तळागाळातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.”

या निवडीमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर, खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धांचे प्रभावी आयोजन आणि संघटनेची विश्वासार्हता वाढविणे या बाबींवर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनीही बालन यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या निवडीसंदर्भातील ठराव सातारा येथील ज्ञानेश काळे यांनी मांडला, तर छत्रपती संभाजीनगर येथील गोकुळ तांदळे यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. आगामी काळात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात संघटनेच्या माध्यमातून अधिक सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत