AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जेव्हा राहुल द्रविडने बोलिंगने मॅच पलटवली होती, एक ओव्हर दोन विकेट आणि…!

भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने 43 व्या षटकात राहुल द्रविड हाती चेंडू दिला. टीम इंडियाच्या मिस्टर दी वॉलने कर्णधाराचा विश्वास सार्थ केला. (Rahul Dravid great bowling Spell When India Won Match)

Video : जेव्हा राहुल द्रविडने बोलिंगने मॅच पलटवली होती, एक ओव्हर दोन विकेट आणि...!
Rahul Dravid
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 1:27 PM
Share

मुंबई :  एकेकाळची भारतीय क्रिकेटची वॉल…. राहुल द्रविड… (Rahul Dravid) आपल्या अप्रतिम बॅटिंगने राहुलने भारताला कितीतरी मॅचेस हातोहात जिंकून दिल्या. त्याने खेळपट्टीवर पाय रोवला की प्रतिस्पर्धी संघाला विजय मुश्किल वाटायचा याउलट भारतीय संघाला विजय निश्चित वाटायचा. त्याने त्याच्या बॅटिंगने जागतिक क्रिकेटमध्ये वेगळीच दहशत निर्माण केली. संथ क्रिकेट खेळणाऱ्या राहुलने एकेदिवशी 17 चेंडूत तडाखेबाज 50 धावा ठोकून टीकाकारांची तोंडं बंद केली. म्हणजेच राहुल कोणत्याही परिघात न बसणारा खेळाडू होता. हे झालं त्याच्या बॅटिंगबद्दल पण त्याने बोलिंगमध्येही एकदा कमाल करत सामना पलटवला होता…. पाहूयात त्यावेळी नेमकं काय झालं होतं…? (Rahul Dravid great bowling Spell When India Won Match)

राहुलच्या बोलिंगची जादू

राहुल द्रविडने 509 सामन्यांच्या कारकीर्दीत केवळ 51 ओव्हर बोलिंग टाकली. त्याने 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटची ओव्हर टाकली. ज्यानंतर त्याने बॉलला हात लावला नाही. यादरम्यान एका मॅचमध्ये राहुलने त्याच्या बोलिंगची जादू जगाला दाखवली.

आपण ज्या मॅचबद्दल बोलतोय ती मॅच 2000 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोची येथे खेळली गेली. पाच एकदिवसीय मालिकेतील हा पहिला सामना होता. प्रथम फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन आणि हर्शल गिब्ज या सलामीच्या जोडीने पाहुण्या संघाला चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून 255 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर सुनील जोशीने 111 धावांवर खेळत असलेल्या गिब्सला बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिले. पहिल्या यशानंतर भारताने झटपट विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

राहुलच्या एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स अन् सामना फिरला!

भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने 43 व्या षटकात राहुल द्रविड हाती चेंडू दिला. टीम इंडियाच्या मिस्टर दी वॉलने कर्णधाराचा विश्वास सार्थ केला. कर्स्टन राहुलच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुलने लान्स क्लूसरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे, एका ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अखेरच्या हाणामारीच्या ओव्हरमध्ये जास्त धावा करू शकला नाही. त्यानी 301 धावा केल्या. त्यानंतर भारताने 49.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेने दिलेलं लक्ष्य यशस्वीरित्या गाठले. राहुलने 6 बॉलमध्ये सामना फिरवला.

पाहा राहुलची अप्रतिम ओव्हर :

(Rahul Dravid great bowling Spell When India Won Match)

हे ही वाचा :

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज

ENG vs NZ : 3 ओव्हरपर्यंत नॉन स्ट्राइकवर राहिल्यानंतरही ठोकलं शतक, 25 वर्षापूर्वीचा विक्रमही तोडला

हजारो किलोमीटर दूरच्या गोलंदाजाने उडवली डेव्हिड वॉर्नरची झोप!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.