हजारो किलोमीटर दूरच्या गोलंदाजाने उडवली डेव्हिड वॉर्नरची झोप!

हजारो किलोमीटर दूरच्या गोलंदाजाने उडवली डेव्हिड वॉर्नरची झोप!
डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रलियन संघाचा सलामीवीर असून त्याची सर्व फॉरमेटमधील कामगिरी उल्लेखनीय आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 03, 2021 | 11:28 AM

सिडनी : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झाली. ज्यामुळे सर्व खेळाडू आपआपल्या घरी परतले. ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर आणि आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरही आपल्या घरी असून सध्या तो फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. मात्र त्याला एका गोलंदाजामुळे झोप लागत नसल्याचं खळबळजनक ट्विट त्याने केलं आहे. हा खेळाडू म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad). सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सराव सामना सुरु असून या सामन्यातील स्टुअर्टचा एक फोटो डेव्हिडने ट्विट केला आहे. (David Warner Posts Stuart Broad Photo Says this player making me sleepless before Ashes Series)

डेव्हिडला काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या अॅशेस सिरीजचे वेध लागले आहेत. त्याचाच संदर्भ देत डेव्हिडने हे ट्विट केले आहे. ट्विटमध्ये डेव्हिडने स्टअर्टचा सामन्यातील फोटो टाकून एक भन्नाट कॅप्शन दिलंय. डेव्हिड लिहितो की, ‘मी इथे ऑस्ट्रेलियामध्ये असून थोडं झोप घ्यायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात हा व्यक्ती माझ्या टीव्ही स्क्रीनवर आला. अॅशेस सिरीज सुरु होण्याआधी झोप घेण्यासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत.’

काय झालं होत मागील अॅशेसमध्ये

अॅशेस ही कसोटी सिरीज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात खेळवली जाते. अत्यंत जुनी आणि मानाची अशी ही सिरीज दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची असते. दरम्यान 2019 साली झालेल्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिडला इंग्लंडच्या स्टुअर्टने अक्षरश: सळो की पळो केलं होतं. पाच टेस्ट सिरीजच्या या मालिकेत स्टुअर्टने डेव्हिडला एकदा-दोनदा नाही तर तब्बल 7 वेळा तंबूचा रस्ता दाखवला होता. यंदा वर्षाखेरीस अॅशेस सिरीज खेळवली जाणार असल्याने त्याच पार्श्वभूमीवर डेव्हिडला पुन्हा ब्रॉड आठवू लागल्याने त्याने हे ट्विट केलं आहे.

हे ही वाचा :

इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या ‘आनंद पोटात माईना…!’

IPL रंगणार खरी पण विदेशी खेळाडूंचे धक्के सुरुच, आता बांगलादेशच्या या दोन खेळाडूंचा उर्वरित सामन्यांना रामराम!

भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना

(David Warner Posts Stuart Broad Photo Says this player making me sleepless before Ashes Series)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें