भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना

ऋद्धिमान साहाने केवळ 18 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. मैदानावर त्याने अक्षरश: चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. (kolkata knight Riders vs Kings Xi punjab IPL 2014 Wriddhiman Saha Hundred on this Day)

भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना
ऋद्धिमान साहा
Akshay Adhav

|

Jun 01, 2021 | 10:27 AM

मुंबई :  टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2019 ची पिंक बॉल टेस्ट एका भारतीय दिग्गजांनी आपल्या नावावर केली होती. या कसोटीमध्ये त्यांने सुपरमॅनची भूमिका निभावली होती. बॉल कुठेही जाऊ द्या, कितीही वेगाने येऊ द्या, बॉलची उंची किती असू द्यात… या विकेटकीपरने प्रत्येक बॉलवर स्वत:ला झोकून दिलं. या कसोटीनंतर त्याची तुलना जगातल्या अनेक दिग्गज विकेटकिपर सोबत होऊ लागली. आपल्यातल्या काही लोकांना आठवत असेल की इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2014 सालच्या अंतिम सामन्यात याच दिग्गज भारतीयाने शतक ठोकलं होतं. ही अंतिम मॅच आजपासून बरोबर सात वर्षांपूर्वी म्हणजेच एक जून 2014 साली खेळली होती. (kolkata knight Riders vs Kings Xi punjab IPL 2014 Wriddhiman Saha Hundred on this Day)

साहाच्या बॅटमधून मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस

भारतीय संघाच्या या दिग्गज फलंदाजाचं नाव आहे ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha)… आयपीएलचा हा अंतिम सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. साहाने 55 चेंडूत 115 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने केवळ 18 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. मैदानावर त्याने अक्षरश: चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

यासह साहा आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाजही ठरला. सलामीवीर मनन वोहराने 52 चेंडूत 67 धावांचं योगदान दिलं. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. वीरेंद्र सेहवाग 7 धावा करु शकला आणि कर्णधार जॉर्ज बेली केवळ 1 धावा करू शकला.

परंतु साहाची खेळी व्यर्थ….!

साहाने खेळलेल्या आक्रमक खेळीनंतर पंजाब नक्की मॅच जिंकणार, असं समिकरण होतं. परंतु मनीष पांडेच्या खेळीसमोर साहाच्या खेळीने टिकाव धरला नाही. मनीष पांडेने अवघ्या 50 चेंडूत 94 धावांची आतिषी खेळी केली.

त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 50 चेंडूत 94 धावा फटकावल्या. युसूफ पठाणने 22 चेंडूत 36 धावा केल्या. शेवटी तीन चेंडू राखून कोलकात्याने पंजाबने दिलेलं आव्हान पूर्ण करत आयपीएलचं जेतेपद पटकावलं. मनीष पांडेच्या वादळी खेळीबद्दल त्याला मॅन ऑफ जी मॅचचा पुरस्कार दिला गेला.

साहाची रिषभसोबत तुलना

ऋद्धिमान साहा आणि टीम इंडियाचा सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची तुलना बर्‍याचदा केली जाते. फलंदाजीच्या बाबतीत पंत साहापेक्षा पुढे असला तरी विकेट किपिंगमध्ये साहा पंतला टक्कर देऊ शकतो. अलीकडच्या काळात पंतने आपल्या विकेट किपींगमध्ये कमालीची सुधारणा केलीय.

(kolkata knight Riders vs Kings Xi punjab IPL 2014 Wriddhiman Saha Hundred on this Day)

हे ही वाचा :

समोर आला स्टीव्ह स्मिथचा अनोखा फोटो, पत्नीने पोस्ट शेअर करत सांगितली वेगळीच सवय!

त्रिनिदादमध्ये जन्म, अर्थशास्त्रात पदवी, भारतीय संघाचा ऑलराऊंडर, फिल्डिंगमध्ये याचा हात कुणीच धरला नाही!

‘बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको…’, शहाणपण शिकवणाऱ्या फॅन्सना धोनीचं संयमी उत्तर, म्हणाला…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें