ENG vs NZ : 3 ओव्हरपर्यंत नॉन स्ट्राइकवर राहिल्यानंतरही ठोकलं शतक, 25 वर्षापूर्वीचा विक्रमही तोडला

ENG vs NZ : 3 ओव्हरपर्यंत नॉन स्ट्राइकवर राहिल्यानंतरही ठोकलं शतक, 25 वर्षापूर्वीचा विक्रमही तोडला
डेवन कॉन्वे

इंग्लंड आणि न्यूझीलंड याच्यांत सराव सामना सुरु आहे. न्यूझीलंडच्या डेवन कॉन्वे (Devon Conway) याने अप्रतिम शतक ठोकत सलामी दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 03, 2021 | 12:26 PM

लंडन :  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या लॉर्डस् मैदानावर (Lords stadium) न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) या दोन संघात सराव कसोटी सामना सुरु आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेवन कॉन्वे (Devon Conway) याच सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे त्याने सलामी सामन्यातच धडाकेबाज शतक ठोकत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) 25 वर्षांपूर्वीचा विक्रमही तोडला आहे. कॉन्वेने सलामीच्या सामन्यात केलेल्या या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (New Zealand Opner Devon Conway Hits Century in his Debut Test at Lords)

माजी भारतीय कर्णधार आणि डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीने 1996 मध्ये कसोटी पदार्पण करताना लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 131 धावा ठोकल्या होत्या. दरम्यान कॉन्वेने देखील आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली आहे. मात्र त्याने दादापेक्षा 5 धावा अधिक केल्या आहेत. त्यामुळे सलामीच्या सामन्यांत  136 धावा ठोकत त्याने दादाचा 25 वर्षांपूर्वीचा  विक्रम मोडीत   काढला आहे.

तीन ओव्हरनंतर खेळला पहिला बॉल

सामन्यानंतरच्या मुलाखतीत कॉन्वे म्हणाला , ”पहिला बॉल खेळण्यासाठी मला तीन ओव्हर वाट पाहावी लागली. पण त्यामुळेच मला बॉलर्स नेमकी कशी बॉलिंग करत आहेत. ते कळालं. मी याआधी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जेम्स एंडरसन (James Anderson) यांच्याविरुद्ध खेळलो नव्हतो. त्यामुळे नॉन स्ट्राईकरवर राहिल्याने मला ते नेमकी कशी बॉलिंग करतात ते कळालं. तसेच मला संधी देण्यासाठी मी न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आणि व्यवस्थापनाचा आभारी आहे.

विलियम्सनसोबत मजेशीर बातचीत

सामन्याआधी डेवन कॉन्वे जेव्हा लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचला. तेव्हा तेथील ऑनर्स बोर्डवर शतक करणाऱ्य आणि एका डावात पांच विकेट घेणाऱ्या खेळाडूंची नाव लिहिण्यात आलेली त्याने पाहिली. त्याबद्दल कॉन्वेने कर्णधार विल्यमसनला विचारणा केली, ”इथे स्वत:चा नाव पाहिल्यावर कसं वाटत? त्यानंतर मी शतक मारल्यावर मला केन म्हणाला, आता तुला कळालं कसं वाटत. हा माझ्यासाठी एक शानदार अनुभव होता” असंही कॉन्वे म्हणाला.

मूळचा दक्षिण आफ्रिकेचा

डेवन कॉन्वे हा मूळचा दक्षिण आफ्रीकेचा (South Africa). तिथेच त्याने क्रिकेट करीयरला सुरुवात केली. मात्र तिथे प्रथम श्रेणी सामन्यांत जास्त संधी मिळत नसल्यानं तो चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडला आला. प्रथम वेलिंग्टन फायरबर्ड्ससाठी खेळल्यानंतर 17 प्रथम श्रेणी सामन्य़ांत चार शतक ठोकल्यानं त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात सहज स्थान मिळालं. टी-20 मधील उत्तम प्रदर्शनामुळे आता कॉन्वे कसोटी क्रिकेटमध्येही सलामीसाठी उतरताना दिसून येतो.

हे ही वाचा :

इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या ‘आनंद पोटात माईना…!’

हजारो किलोमीटर दूरच्या गोलंदाजाने उडवली डेव्हिड वॉर्नरची झोप!

भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना

(New Zealand Opner Devon Conway Hits Century in his Debut Test Against England at Lords)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें