कर्णधारपदावरुन रहाणेची उचलबांगडी, स्टीव्ह स्मिथकडे राजस्थानची धुरा

जयपूर : आयपीएल फ्रँचायजी राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली आहे. या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. रहाणे एक खेळाडू म्हणून संघासोबत असेल. पण नेतृत्त्वाची धुरा आणि स्मिथकडे देण्यात आल्याचं राजस्थान रॉयल्सने म्हटलंय. रहाणेच्या नेतृत्त्वात गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. राजस्थान रॉयल्सची कामगिरी या …

कर्णधारपदावरुन रहाणेची उचलबांगडी, स्टीव्ह स्मिथकडे राजस्थानची धुरा

जयपूर : आयपीएल फ्रँचायजी राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली आहे. या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. रहाणे एक खेळाडू म्हणून संघासोबत असेल. पण नेतृत्त्वाची धुरा आणि स्मिथकडे देण्यात आल्याचं राजस्थान रॉयल्सने म्हटलंय. रहाणेच्या नेतृत्त्वात गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.

राजस्थान रॉयल्सची कामगिरी या मालिकेत अत्यंत निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. चार अंकांसह राजस्थान गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. शिवाय मालिकेतून बाहेर जाण्याची नामुष्की राजस्थानवर ओढावू शकते. मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानचा पुढील सामना होत आहे.

राजस्थान रॉयल्सच्या प्रमुखाची प्रतिक्रिया

स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा देण्याबाबत राजस्थान रॉयल्सचे प्रमुख जुबिन भरुचा यांनी प्रतिक्रिया दिली. “अजिंक्य सध्या संघात आहे आणि तो कायम आमच्यासोबत असेल. त्याने 2018 मध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत संघाला प्लेऑफपर्यंत नेलं होतं. अजिंक्य आमचा संघ आणि नेतृत्त्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि स्मिथला गरज लागेल तिथे तो मदतीसाठी तयार असेल. स्टीव्ह स्मिथ सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सला यशाकडे घेऊन जाईल,” अशी अपेक्षा भरुचा यांनी व्यक्त केली.

अजिंक्य रहाणेची सरासरी कामगिरी

अजिंक्य रहाणेची या मालिकेतील कामगिरी सरासरी राहिली आहे. या मोसमातील आठ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 201 धावा आहेत, ज्यात 70 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. 133.1 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *