रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर अश्विन म्हणाला, ‘सॉरी भज्जू पा’, हरभजनकडून मिळालं सॉलिड उत्तर

अश्विनने (r ashwin) पहिल्या डावात गोलंदाजी करताना एकूण 5 फलंदाजांना आऊट केलं.

रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर अश्विन म्हणाला, 'सॉरी भज्जू पा', हरभजनकडून मिळालं सॉलिड उत्तर
आर आश्विन
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:31 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर ऑल आऊट केलं. त्यामुळे दुसऱ्या डावात 195 धावांच्या आघाडीसह 54 धावा केल्या. यामुळे भारताने दुसऱ्या दिवसखेर 249 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात लोकल बॉय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. (Ravichandran Ashwin says sorry Bhajju Pa after breaking Harbhajan Singh record)

काय आहे पराक्रम?

यासह इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर गुंडाळण्यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉर्डला आऊट करत अश्विनने 5 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विन कसोटीमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना 200 वेळा बाद करणारा पहिला फलंदाज ठरला.

अँडरसनला पछाडलं

अश्विनने मायदेशातील कसोटींमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले. अँडरसनने 89 कसोटीत 22 वेळा इंग्लंडच्या भूमीवर पाच विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत अश्विनच्या पुढे फक्त तीन गोलंदाज आहेत. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरनने तब्बल 45 वेळा ही कामगिरी केली आहे. तर रंगाना हेराथ 26 आणि भारताच्या अनिल कुंबळेने 25 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतात 23 वेळा 5 विकेट्स

अश्विनने इंग्लंडचा डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, ऑली स्टोन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बाद केलं. यासह अश्विनने कसोटीमध्ये 29 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनने एकूण 23 वेळा भारतात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 6 वेळा भारताबाहेर ही कामगिरी केली आहे.

हरभजनचा रेकॉर्ड मोडित

दरम्यान, अश्विनने भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंहचा रेकॉर्ड मोडला आहे. भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे याचा नंबर लागतो. त्यानंतर अश्विनने आता दुसरं स्थान पटकावलं आहे. यापूर्वी हरभजन सिंह दुसऱ्या स्थानी होता. हरभजनचा रेकॉर्ड मोडित काढल्यानंतर अश्विनने त्याच्या वरिष्ठ माजी सहकारी हरभजन सिंह याची माफी मागितली आहे. दरम्यान, अश्विनने माफी मागितल्यानंतर हरभनजने अश्विनचं कौतुक करत त्याला असंच यश मिळवत राहा, अशा शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

भारतात 266 विकेट्स

हरभजन सिंहने भारतात 28.76 च्या सरासरीने 265 विकेट मिळवल्या आहेत. तर अश्विनने 25.26 च्या सरासरीने 76 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स मिळवल्या आहेत. एकूण 391 विकेट घेणाऱ्या अश्विनला त्याच्या या कामगिरीबाबत माहिती नव्हती. सामना संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा करत असताना त्याला याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी अश्विन म्हणाला की, ‘जेव्हा मी 2001 च्या सिरीजमध्ये भज्जू पा ला (हरभजन) खेळताना पाहिलं होतं. तेव्हा मला कधीही असं वाटलं नव्हतं की, मी कधी भारतीय संघासाठी ऑफस्पिनर म्हणून खेळू शकेन. मी तेव्हा माझ्या राज्यासाठी क्रिकेट खेळत होतो आणि मी एक फलंदाज म्हणून करिअर घडवू पाहात होतो.

‘…सॉरी भज्जू पा’ : अश्विन

अश्विन म्हणाला की, सुरुवातीच्या काळात मी जेव्हा हरभजनप्रमाणे गोलंदाजी करायचो तेव्हा सर्वजण माझी थट्टा करायचे. अश्विन म्हणाला की, ‘त्या वयातील माझे सहकारी माझी चेष्टा करायचे, कारण मी भज्जू पासारखी गोलंदाजी करायचो. त्याचे रेकॉर्ड मोडण्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे खास असायला हवं. मला त्याबद्दल माहिती नव्हती, आता जेव्हा मला त्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. मला माफ कर, भज्जू पा. ‘

अश्विन तू चॅम्पियन आहेस : हरभजन

या प्रतिक्रियेनंतर हरभजनने अश्विनला उत्तर दिलं आहे. हरभजन म्हणाला की, “अश्विन तू चॅम्पियन आहेस. मी प्रार्थना करतो की, तू याहून मोठे रेकॉर्ड बनवावे. तू असाच खेळत राहा. भावा तुला त्यासाठी शक्ती मिळत राहो.”

संबंधित बातम्या :

Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला

India vs England 2nd Test, 2nd Day Highlights | दुसऱ्या दिवसखेर रोहित-पुजारा नाबाद, टीम इंडियाकडे 249 धावांची भक्कम आघाडी

India vs England 2nd Test | Video | ‘उडता’ रिषभ, विकेटकीपर पंतचा एकहाती भन्नाट कॅच

(Ravichandran Ashwin says sorry Bhajju Pa after breaking Harbhajan Singh record)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....