IPL 2025 मध्ये RCB किंग, पण सर्वात जास्त पैसा छापला मुकेश अंबानींनी
IPL 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर विजय मिळवला. RCB ने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीची टीम किंग ठरली पण सर्वात जास्त पैसा कमावला तो मुकेश अंबानी यांनी. कसा ते समजून घ्या.

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा फायनल सामना 3 जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला. विराट कोहलीसाठी यंदाचा सीजन खास आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 18 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपुष्टात आली. यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदा RCB टीम चॅम्पियन ठरली. त्यांनी फायनलमध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवला. आरसीबी टीमने विजेतेपदाचा चषक उंचावल. पण IPL 2025 च्या फायनलने फक्त BCCI च नाही, तर जियो हॉटस्टार या ब्रॉडकास्टरवर देखील पैशांचा पाऊस पाडला. यंदा 64.3 कोटी प्रेक्षकांनी फायनल सामना पाहण्याचा आनंद लुटला.
मागच्यावर्षी 60.2 कोटी क्रिकेट प्रेमींनी जियो सिनेमावर आयपीएल फायनल पाहण्याचा आनंद लुटला होता. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघाला. आता जियो सिनेमा आणि हॉटस्टारच मर्जर झालं आहे. त्यामुळे जियो हॉटस्टरावर कोट्यवधी लोकांनी PBKS आणि RCB चा अंतिम सामना पाहिला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा किती टक्के हिस्सा?
Royal Challengers Bengaluru आणि Punjab Kings यांच्यातील अंतिम सामन्यातून मुकेश अंबानी यांनी भरपूर पैसा कमावला. हॉटस्टार आणि जियो सिनेमाच्या मर्जरनंतर जियो हॉटस्टारमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा 63.16 टक्के हिस्सा आहे. यात 46.82 टक्के वायकॉम 18 च्या माध्यमातून आणि 16.34 टक्के डायरेक्ट हिस्सेदारी आहे. फायनल मॅच दरम्यान जबरदस्त व्यूअरशिपमुळे आज 4 जून रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळू शकते.
कसा पैसा कमावतात?
मॅच पाहण्यासाठी लोक जियो हॉटस्टारच सब्सक्रिप्शन विकत घेतात. त्यातून जियो हॉटस्टारला पैसा मिळतो. सब्सक्रिप्शन प्लान्समधून रेवेन्यू वाढण्याचा थेट अर्थ हा आहे की, मुकेश अंबानी यांची घसघशीत कमाई. फक्त केवळ सब्सक्रिप्शन प्लान्स नाही, मॅचच्या लाइव स्ट्रीमिंग दरम्यान जाहीरातींमधून मुकेश अंबानी तगडी कमाई करतात.
किती हजार कोटींची कमाई?
आयपीएल मॅच दरम्यान 10 सेकंदाच्या जाहीरातीसाठी 18 ते 19 लाख रुपये चार्ज केले जातात. यावेळी त्यात 20 ते 30 टक्के वाढू होऊ शकते, असं आयपीएल सुरु होण्याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मुकेश अंबानी आयपीएल सामन्यादरम्यान जाहीरातींच्या माध्यमातून 6 हजार कोटींची कमाई करु शकतात अशी आयपीएल सुरु होण्याआधी चर्चा होती.
सध्या अधिकृत माहिती नाही
तुम्ही मॅच दरम्यान ज्या जाहीराती पाहता त्यासाठी ब्रॉडकास्टर (जियो हॉटस्टार) कंपनी मोठ्या प्रमाणात पैसा चार्ज करते. फायनल मॅचनंतर या बद्दलची माहिती समोर येऊ शकते. नेमके जाहारीती आणि सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून किती पैसा कमावला. पण या बद्दल सध्या कुठली अधिकृत माहिती नाहीय.
