Reliance Jio ची अमरनाथ यात्रेकरुंसाठी बंपर ऑफर

रिलायन्स जिओने अमरनाथ यात्रेकरुंसाठी खास प्लॅन लाँच केला आहे. यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये 102 रुपयांचा प्रीपेड प्लॅन उपलब्ध असेल.

Reliance Jio ची अमरनाथ यात्रेकरुंसाठी बंपर ऑफर

नवी दिल्ली: रिलायन्स जिओने अमरनाथ यात्रेकरुंसाठी खास प्लॅन लाँच केला आहे. यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये 102 रुपयांचा प्रीपेड प्लॅन उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेल व्हॉईस कॉलसह मेसेज आणि इंटरनेट डाटाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 500 एमबी हाय-स्पीड इंटरनेट डाटा मिळणार आहे. डाटा संपल्यानंतर त्यापुढील इंटरनेट वापराला 64 केबीपीएसचा स्पीड मिळेल.

जम्मू-काश्मीरमध्ये येणारे जिओचे प्रीपेड सब्सक्रायबर्स नवे लोकल कनेक्शन खरेदी करुन लेटेस्ट प्लॅनचा फायदा घेऊ शकतात. जिओने 102 रुपयांचा हा प्लॅन जम्मू-काश्मीरमधील अनेक रिटेलर्सच्या मदतीने उपलब्ध करुन दिला आहे. हा प्लॅन अमरनाथ यात्रेच्या पूर्ण काळात उपलब्ध असेल.

जम्मू काश्मीरमध्ये प्रीपेड सब्सक्रायबर्ससाठी रोमिंगची सुविधा देण्यावर बंदी आहे. त्यामुळे देशभरातून अमरनाथ यात्रेला येणाऱ्या श्रद्धाळूंना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याचाच विचार करुन रिलायन्स जिओने अमरनाथ यात्रेकरुंसाठी हा प्लॅन लाँच केला आहे. यामुळे अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरुंना घरच्यांशी बोलता येणे सहजसोपे होईल.

रिलायन्स जिओच्या 102 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनप्रमाणेच आणखी एक 98 रुपयांचा प्लॅनही आहे. त्याची वैधता (व्हॅलिडिटी) 28 दिवसांची आहे. यात ग्राहकांना 2GB डाटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा मिळेल. या व्यतिरिक्त एक 142 रुपयांचाही प्लॅन आहे. यात 300 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5GB हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *