शिखर धवनला दुखापत, ऋषभ पंत लंडनचं विमान पकडण्याच्या तयारीत

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या निवडीदरम्यान ऋषभ पंतचं नाव चर्चेत होतं. मात्र दिनेश कार्तिकच्या अनुभवामुळे त्याची निवड झाली. आता धवनला दुखापत झाल्याने ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश पक्का मानला जातो.

शिखर धवनला दुखापत, ऋषभ पंत लंडनचं विमान पकडण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jun 11, 2019 | 6:01 PM

लंडन : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवडे संघाबाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाची ऐन वर्ल्डकपमध्ये डोकेदुखी वाढली आहे. धवन तीन आठवडे संघाबाहेर असला तरी तो त्यानंतर तरी वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार का हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अशा परिस्थितीत धवनऐवजी भारतीय संघात युवा खेळाडू ऋषभ पंतचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. विश्वचषकात भारताचा पुढचा सामना 13 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. त्यामुळे येत्या काही तासात ऋषभ पंत लंडनचं विमान पकडू शकतो.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या निवडीदरम्यान ऋषभ पंतचं नाव चर्चेत होतं. मात्र दिनेश कार्तिकच्या अनुभवामुळे त्याची निवड झाली. आता धवनला दुखापत झाल्याने ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश पक्का मानला जातो. धवन फलंदाजी करत असताना, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सचा वेगवान चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. त्यामुळे धवनला दुखापत झाली.

टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “धवनच्या दुखापतीचा संपूर्ण अहवाल समोर आल्यानंतर त्याच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूची नियुक्ती होईल. धवनच्या जागी पंत असेल”.

टीम इंडियाचा स्टार जसप्रित बुमराचं या अभिनेत्रीसोबत डेटिंग?

सलामीला कोण?

धवनऐवजी रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याबाबतची उत्सुकता आहे. शिखर धवन बाहेर पडल्यामुळे सलामीसाठी के एल राहुलचा पर्याय कर्णधार विराट कोहलीकडे आहे. विश्वचषकात भारताचा पुढचा सामना 13 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. या सामन्यात रोहितसोबत के एल राहुल सलामीला उतरु शकतो. राहुलने यापूर्वी भारताकडून अनेक सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे तो प्रबळ दावेदार असू शकतो. मात्र राहुल जर सलामीला आला तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार हा प्रश्न आहे. जर ऋषभ पंतला संधी मिळाली तर तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.

संबंधित बातम्या

Shikhar Dhawan : भारताला झटका, शिखर धवन 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर   

World Cup | के एल राहुल सलामीला आल्यास चौथ्या नंबरवर कोण खेळणार?  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.