AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuzvendra chahal : असंभव.. ! घटस्फोट होताच चहलचं ते रूप पाहून आरजे महवशने थेट..

PBKS vs KKR : आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याच्या पुनरागमनाने खळबळ उडवून दिली आहे. अत्यंत कमी धावसंख्येचे लक्ष्य असलेल्या कालच्या सामन्यात त्याने केकेआरच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. चहलने सामन्यात चार विकेट घेतल्या, त्यानंतर सर्वांनी त्याचे कौतुक केले. दरम्यान, चहलशी सतत नाव जोडलं जाणारी आरजे महवशही खूप आनंदी दिसली. तिच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Yuzvendra chahal : असंभव.. ! घटस्फोट होताच चहलचं ते रूप पाहून आरजे महवशने थेट..
चहल-महवशImage Credit source: social media
| Updated on: Apr 16, 2025 | 11:05 AM
Share

PBKS vs KKR : आयपीएल 2025 चा सीझन सध्या चांगलाच चर्चेत असून काल पंजाब वि. कोलकाताची मॅच तर फारच रोमहर्षक होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट टिपणारा युजवेंद्र चहलने कालच्या सामन्यात तूफान गोलंदाजी करत धमाकेदार पुनरागमन केलं. पंजाबने कोलकातासमोर विजयासाठी अतिशय कमी धावांचे (111) आव्हान ठेवले होते, ते सहज पार करून केकेआर जिंकेल असे वाटत असतानाच चहलच्या गोलदंदाजीने सामनाच पलटला. त्याने कोलकाताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला आणि पंजाबला विजय मिळवून दिला. चहलने सामन्यात चार विकेट घेतल्या आणि तो पंजाब किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानंतर सर्वांनी त्याचे कौतुक केले.

पण सर्वाधिक चर्चेतील पोस्ट ठरली ती एका व्यक्तीची. धनश्रीशी घटस्फोट झाल्यानंतर चहलचं नाव सतत जिच्याशी जोडलं जातं त्याच आरजे. महावशेने चहलसाठी इन्स्टावर खास पोस्ट लिहीली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. चहल आणि महवशच्या अफेअरच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.

आऊट फॉर्म होता चहल

कालच्या केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी आयपीएलच्या या सीझनमध्ये चहलच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली नाही. पण कालच्या सामन्यात तो अचानक फॉर्ममध्ये आला आणि पंजाबला अतिशय चमतकारिक, अविश्वसनीय विजय त्याने मिळवून दिला. पंजाबच्या संघाने केकेआरसमोर विजयासाठी फक्त 112 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते, परंतु चहलने 4 महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून सामन्याची दिशाच बदलून टाकली

महवशची चहलसाठी खास स्टोरी

मचहलच्या जादूमुळे पंजाबने हा सामना जिंकला आणि त्याच्या शानदार खेळीसाठी चहलला प्लेयर ऑफ दि मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र त्याचं कौतुक फक्त मैदानावरच झालं नाही तर आरजे महवशनेही चहलच्या कौतुकासाठी खास पोस्ट केली. तिने चहलसोबत सेल्फी काढत असतानाचा, एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. ‘(तू) किती प्रतिभावान माणूस आहेस, म्हणूनच तू आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहेस, असंभव.’ असे कौतुकाचे शब्दही महवशने चहलसाठी लिहीले.

चहल-महवशच्या अफेअरची चर्चा

काल चहलच्या शानदार गोलंदाजीमुळे पंजाबने 16 धावांनी विजय मिळवला. नुकताच युजवेंद्र चहलचा धनश्रीशी घटस्फोट झाला. याआधीही त्याच्या आणि महविशच्या अफेअरच्या जोरदार अफवा होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात दोघेही एकत्र दिसले होते. याआधीही दोघे एकत्र दिसले होते. चहल आणि महविश एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. चहल अनेकदा महविशच्या फोटोंवर कमेंट्सही करताना दिसतो.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.