AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : रोहित शर्माचा भीमपराक्रम! एक शतकासह क्रिकेटच्या देवाचाच रेकॉर्ड ब्रेक

नागपूरमधे सुरू असलेल्या कसोटीमध्ये शतक पूर्ण करत एक दोन नाहीतर अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

IND vs AUS : रोहित शर्माचा भीमपराक्रम! एक शतकासह क्रिकेटच्या देवाचाच रेकॉर्ड ब्रेक
| Updated on: Feb 10, 2023 | 5:39 PM
Share

नागूर :  नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या (INDvsAUS First Test) दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्माने दमदार शतक ठोकलं. रोहित शर्माने पहिल्या दिवशीच आक्रमक खेळी करत चांगली सुरूवात करून दिली होती. दुसऱ्या दिवशी भारताच्या एकापाठोपाठ विकेट जात होत्या. दुसरीकडे रोहितने आपली बाजू लावून धरली असताना आपलं शतक पूर्ण केलं. (Rohit Sharma Record) या शतकाच्या जोरावर रोहितने एक दोन नाहीतर अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

भारताच्या 168 धावांमध्ये 5 विकेट्स गेल्या, भारताच्या आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने भागीदारी करत डाव सावरला. रोहितने आजच्या शतकासह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रोहित शर्मा हा भारताच्या तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक झळकावणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान, पाकिस्तानचा बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिसच्या नावावर आहे.

कांगारूंविरुद्ध सलामीला येत सर्वाधिक शतक ठोकण्याच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. तर सचिनने याआधी सलामीवीर म्हणून सर्वाधिक 9 शतके झळकवली होतीत.

आता क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये रोहितने उडी घेत स्टीव्ह स्मिथला मागे टाकलं आहे. आता खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीने 74 तर डेव्हिड वॉर्नर 45, जो रूट 44, रोहित शर्मा 43 आणि स्टीव्ह स्मिथने 42 शतके केली आहेत. आणखी एक अनोखा विक्रम म्हणजे तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा रोहित शर्मा कर्णधार असतानाही आणि कर्णधार नसतानाही शतक केलं आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी केलेरल्या भागीदारीच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता 100 धावांपेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.