AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचा बालपणीचे कोच दिनेश लाड यांचा मोठा दावा, रोहित याने म्हटले होते…

IND vs AUS Final : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा याचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2011 मध्ये काय झाले होते आणि आता 2023 मध्ये काय होणार? हे सांगितले.

रोहित शर्माचा बालपणीचे कोच दिनेश लाड यांचा मोठा दावा, रोहित याने म्हटले होते...
rohit sharma childhood coach dinesh ladImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 19, 2023 | 12:07 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई दि. 19 नोव्हेंबर | वनडे वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा आज आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप क्रिकेटचा फाइनल सामना रंगणार आहे. सलग सर्व सामने जिंकून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आता रोहित शर्मा यांच्याकडे महेंद्रसिंह धोनी याच्या संघाने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा याचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2011 मध्ये काय झाले होते आणि आता 2023 मध्ये काय होणार? हे सांगितले. रोहित शर्मा याने विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच दिले आश्वासन

वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा याने बालपणीचे कोच असलेले दिनेश लाड यांची भेट घेतली होती. त्यावेळी रोहित शर्मा याने आपणास वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवू, असे आश्वासन दिले होते. रोहित याचे आश्वासन आणि भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यानंतर मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की, भारतीय टीम चांगली खेळत आहे. यामुळे भारत संघ अंतिम सामन्यात विजय मिळवेल. आजचा सामना जिंकल्याने 130 कोटी भारतीयांना टीम इंडिया दीपावली भेट देणार आहे. दिनेश लाड यांनीही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

2011 मध्ये काय घडले

दिनेश लाड यांनी सांगितले की, 2011 मध्ये वर्ल्ड कप संघात रोहित शर्मा याचा समावेश झाला नव्हता. त्यानंतर त्याला घरी बोलवून चांगलेच फटकारले होते. तुझा चांगला अभ्यास झाला नाही. त्यामुळे कामगिरी चांगली झाली नाही. त्यावेळी रोहित म्हणाला होतो, सर, आता यापुढे तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. त्यानंतर रोहित याने फलंदाजीतून अनेक नवनवीन विक्रम केले. रोहित शर्मा 12 वर्षांचा असताना दिनेश लाड यांची नजर त्याच्यावर पडली होती. त्यावेळी रोहित शाळेच्या संघातून ऑफ स्पिनर गोलंदाजी करत होता. दिनेश लाड यांनी त्याला फलंदाज बनवले आणि रोहितने टीम इंडियापर्यंत मजल मारली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना