रोहित शर्माची ‘खेलरत्न’साठी शिफारस, चौथा क्रिकेटपटू ठरणार

रोहित शर्मा व्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू यांचीही शिफारस 'राजीव गांधी खेल रत्न' पुरस्कारासाठी केली गेली आहे

रोहित शर्माची 'खेलरत्न'साठी शिफारस, चौथा क्रिकेटपटू ठरणार

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर मोहर उमटवली. (Rohit Sharma recommended for Rajiv Gandhi Khel Ratna award by the sports ministry’s selection committee)

रोहित शर्मा व्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू यांचीही शिफारस ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी केली गेली आहे. ‘खेलरत्न’ हा भारतीय नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकर (1997-98), एमएस धोनी (2007) आणि विराट कोहली (2018) यांना याआधी हा सन्मान देण्यात आला आहे.

33 वर्षीय रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. मुंबईकर रोहितचा जन्म नागपूरचा, तर बालपण बोरिवलीत गेले. 2006 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिसेंबर 2009 मध्ये त्याने रणजी करंडक स्पर्धेत त्याने गुजरातविरुद्ध कारकीर्दीतील सर्वाधिक 309 धावा (नाबाद) ठोकल्या होत्या.

2 फेब्रुवारी 2020 पर्यंत, रोहित शर्माने 364 आंतरराष्ट्रीय सामने खेळले (32 कसोटी, 224 एकदिवसीय, 108 टी20) आहेत. यामध्ये 39 शतके (6 कसोटी, 29 एकदिवसीय, 4 टी20) समाविष्ट आहेत.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी 12-सदस्यीय निवड समितीने सोमवारी द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी शिफारस केली होती, तर मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी नावे अंतिम केली आहेत.

(Rohit Sharma recommended for Rajiv Gandhi Khel Ratna award by the sports ministry’s selection committee)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI