इकडे आशिया कपसाठी टीमची घोषणा, तिकडे रोहित शर्माला आलं टेन्शन; तडकाफडकी दिला मोठा संदेश!
आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माच्या एका कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. एकीकडे भारतीय संघाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असताना दुसरीकडे रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लोकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Rohit Sharma : आशिया विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीममध्ये कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाल डच्चू मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माच्या एका कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. एकीकडे भारतीय संघाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असताना दुसरीकडे रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लोकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
टीम इंडियात आता कोणाकोणाला संधी?
बीसीसीआयने आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या घोषणानुसार आता टी-20 संघात शुभमन गिलची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे. तर शुभमन गिल हा उपकरर्णधार असेल. तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्णा, जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश असेल. त्यामुळे आता ही टीम नेमकी कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- rohit sharma instagram post
रोहित शर्माला का टेन्शन आलं, काय संदेश दिला?
एकीकडे भारतीय संघाची घोषणा होत होती. तर याच घोषणेआधी रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली. त्याने स्टे सेफ अँड टेक केअर असे म्हटले आहे. म्हणजेच त्याने लोकांना सुरक्षित राहा आणि काळजी घ्या असा संदेश दिलाय. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. लोकलचे काही मार्गदेखील बंद करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले असून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. रोहित शर्मा हा मुळचा मुंबईचा आहे. मुंबईप्रती त्याचे विशेष प्रेम आहे. मुंबईतील सध्याची स्थिती लक्षात घेऊनच त्याने मुंबईकरांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, उपनगरातील लोकांनी काळजी घ्यावी, असे त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले आहे.

