Sahibzada Farhan Gun Celebration: दहशतवाद्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?; साहिबझादा फरहाच्या कृत्यावर नेटकरी भडकले

Sahibzada Farhan Gun Celebration: काल दुबईत झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात साहिबझादा फरहाने अर्ध शतक झळकावलं. त्यानंतर त्याने केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Sahibzada Farhan Gun Celebration: दहशतवाद्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?; साहिबझादा फरहाच्या कृत्यावर नेटकरी भडकले
IND vs PAK Asia Cup 2025
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 22, 2025 | 1:39 PM

IND vs PAK Asia Cup 2025 Super 4 : रविवारी 21 सप्टेंबर रोजी दुबईत आशिया कप 2025 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाला. टीम इंडियाने सुपर 4 फेरीत 6 विकेट्सने मात करत फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. भारताने विजय मिळवत पाकिस्तानी खेळाडूंना त्यांची जगा दाखवून दिली. पण सरळ मार्गाने खेळतील ते पाकिस्तानी खेळाडू कसले. पाकच्या फलंजादाच्या वागणुकीमुळे भारतात संताप व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी आता यावर प्रतिक्रिया देत चांगलेच सुनावले आहे.

नेमकं काय झालं होतं?

पाकिस्तानचा खेळाडू साहिबझादा फरहानने टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक, 58 धाव्या केल्या. त्याने 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतर साहिबझादाच्या डोक्यात हवा गेली. त्याने अर्धशकत झाल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. साहिूबझादाने अर्धशतक झाल्यावर हातातली बॅट बंदूकीसारथी पकडली आणि फायरिंग करण्याची अॅक्शन केली. ते पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी आता कमेंट्स करत साहिबझाद्याची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली आहे.

Viral Video: चांदीची चप्पल, दीड किलो सोने.. कोट्यावधींची कॅश! ट्रान्सजेंडरच्या घरातील व्हिडीओ पाहून चकीत व्हाल

काय म्हणाले नेटकरी?

एका यूजरने सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या शेजारी साहिबझादाचा हातात बॅट असलेला फोटो शेअर केला आहे. ‘जेव्हा तुम्हाला पाकिस्तानच्या दहशतवादी सैनिकांच्या संस्थेकडून ट्रेनिंगमिळते तेव्हा तुम्ही काय अपेक्षा करता. पार्ट टाइम क्रिकेटर, फूल टाइम दहशतवादी’ असे म्हटले आहे.

दुसऱ्या एका यूजरने यावरून दहशतवाद्यांची खरी मानसिकता उघड होते, जे केवळ मैदानाबाहेरच नाही तर क्रिकेटच्या मैदानावरही द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहे. त्यांचे खेळाडू असे वागतात की त्यांना खेळाच्या भावनेसाठी नव्हे तर दहशतवादासाठी प्रशिक्षण दिले जाते असे म्हटले आहे.

तिसऱ्या एका यूजरने, दहशतवादी नेहमीच दहशतवादी असतात. क्रिकेट खेळताना, हे वाईट लोक बॅटऐवजी निष्पाप लोकांना मारण्यासाठी एके-४७ घेऊन येत आहेत असे त्यांना वाटते. या वाईट लोकांना श्रद्धांजली! असे म्हटले आहे.

चौथ्या यूजरने साहिबजादाचा फोटो शेअर करत, जन्मच दहशतवादी बनण्यासाठी झाला आहे, पण जबरदस्ती क्रिकेट खेळण्यास भाग पाडले आहे असे कॅप्शन दिले आहे.

कश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळू नये अशी भारतवासियांची भावना आहे. तीव्र विरोधानंतरही दोन्ही देशातील संघात सामने झाले. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात गेल्या रविवारी 14 सप्टेंबरला साखळी फेरीत सामना झाला. त्या सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे सामना जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसह हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे नो हँडशेकवरुन वाद झाला होता. हा वाद मिटतोय तेवढ्यात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबझादा फरहान याने केलेल्या सेलिब्रेशेनमुळे नेटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.