सानिया मिर्झा हिला प्रचंड भीती, पहिल्यांदाच केला खुलासा, थेट म्हणाली, कायम..
सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सानियाने मोठा काळ टेनिसमध्ये गाजवला असून तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सानिया आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला असून सानिया सध्या दुबईतच आपल्या मुलासोबत राहते.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सानियाने मोठा काळ टेनिसमध्ये गाजवला असून मोठे विक्रम तिच्या नावावर नोंदवलेले आहेत. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. सानिया पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न करणार कळताच अनेकांनी डोक्याला हात लावली. हेच नाही तर सानिया आता पाकिस्तानकडून टेनिस खेळणार का? हा प्रश्नही त्यादरम्यान काहींनी उपस्थित केला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे हैद्राबादमध्ये लग्न झाले. मात्र, लग्नामध्ये पाकिस्तान किंवा भारतात राहण्यापेक्षा त्यांनी दुबईत राहण्याचा निर्णय घेतला. सानिया आणि शोएब मलिक यांचा मुलगा आहे. मात्र, अचानक शोएब मलिक याने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी घटस्फोट घेतला.
सानिया मिर्झा हिने घटस्फोट घेताच शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. शोएब मलिकसोबत झालेल्या घटस्फोटावर पहिल्यांदाच काही दिवसांपूर्वी बोलताना सानिया दिसली. सानिया मिर्झा हिने फराह खान हिच्या ब्लॉगिंगमध्ये सांगितले की, घटस्फोटानंतर तिची स्थिती काय होती, आणि ती घाबरून थरथर कापत होती. हेच नाही तर आयुष्यात आलेले वादळ तिने कशाप्रकारे हाताळले.
सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मी बऱ्याचदा रात्री जेवण करत नाही. मला एकटीला जेवण करायला आवडत नाही, एकट्यानेच बसून काय खावे. यातून तिने बऱ्याच मोठा मेसेज दिला होता. काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झा हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना सानिया पहिल्यांदाच तिच्या डाएटबद्दल बोलताना दिसली. सानिया मिर्झा म्हणाली, मला साधे जेवण प्रचंड आवडते. ज्यावेळी मी टेनिस सोडले त्यावेळी माझ्यासाठी फिटनेस राहणे महत्वाचे ठरते.
माझ्या जेवणात एक भाजी, चिकन, मासे किंवा मटणची करी असते. यासोबतच एक भाजी असते. आमच्या घरी सर्वांनाच सलाद खूप आवडते. माझ्या जेवणात सलाद असते म्हणजे असतेच. भात देखील जेवणात असतो. मात्र, फिटनेसदरम्यान मला भात खाताना भीती वाटते. सानिया मिर्झा हिने स्पष्टपणे म्हटले की, तिच्या जेवणात चिकन किंवा मटण करी, सलाद आणि भात असतो. टेनिस सोडल्यानंतरही सानिया मिर्झा आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना कायमच दिसते.
