Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचं जुळलं ? गोव्यातील त्या तरुणासोबतच्या व्हायरल फोटोची सत्यता काय?
सारा तेंडुलकरने ज्याच्यासोबत गोव्यात वेळ घालवला तो तरूण आहे तरी कोण ? साराचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, सध्या सगळीकडे फक्त साराबद्दल चर्चा. तो तरूण आणि साराचं कनेक्शन तरी काय ?

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा लेक आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच साखरपुडा झाला. सानिया चंडोकशी नातं जुळल्यानंतर अर्जुन खूप चर्चेत होता. तर आता सचिनची लेक , साराचं पर्सनल आयुष्यही खूप चर्चेत आलं आहे. सोशल मीड्यावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेल्या साराचे लाखो चाहते आहे. आता सारा तेंडुलकरचे काही फोटो व्हायरल झाले असून ते गोव्याचे असल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये सारा एका तरूणासोबत दिसत्ये, मात्र तो तरूण आहे तरी कोण ? सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने सारा आणि त्या तरूणाचे फोटो पसरले असून त्यांच्या त्या फोटोंमागचं सत्य आहे तरी काय ? या फोटोंमध्ये सारा आणि तो तरूण खूप निकट दिसत आहेत, त्यावरून तरी असं वाटतंय की तो तिच्यासाठी कोणी खास आहे. पण तो तरूण आहे तरी कोण ?
सारासोबत दिसणारा तरूण कोण ?
सर्वप्रथम, सारा तेंडुलकरसोबतचा तो मुलगा कोण आहे ते जाणून घेऊया. रिपोर्ट्सनुसार, त्या मुलाचे नाव सिद्धार्थ केरकर असल्याचे समजते. सोशल मीडियावर त्याचे वर्णन एक बिझनेसमन म्हणून केलं आहे. तर त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून तो एक कलाकार असल्याचं दिसून येतं. आतात सिद्धार्थ ककेरकच्या प्रोफाईलबद्दल जितकं कन्फ्यूजन आहे, तितकंच कन्फ्यूजन त्याच्या आणि साराच्या नात्याबद्दलही आहे.
View this post on Instagram
सारा-सिद्धार्थचं नातं काय ?
सोशल मीडियावर अशी चर्चा रंगू लागली आहे की सिद्धार्थ केरकर हा साराचा बॉयफ्रेंड आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये त्यांचे हाव-भाव तसे असले तरीही TV9 मराठी मात्र त्यांच्या या नात्याबद्दल कोणातही दावा करत नाहीये. जे फोटो समोर आलेत, त्यावरून फक्त चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
काही काळापूर्वी सारा तेंडुलकरचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले गेले होते. दोघांचेही अनेक फोटो व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्याबद्दलची बातमी ही अफवाच ठरली. आता सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर, सारा तेंडुलकरचे सिद्धार्थ केरकरशी असलेल्या नात्याबद्दल जाणून घेण्याची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे, तिकडे दुर्लक्ष करणं अनेकांसाठी कठीण आहे. मात्र त्यांचं नातं नेमकं काय हे अद्याप अधिकृतपण समोर आलेलं नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)
