AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar : टीम इंडियाच्या विजयानंतर शोएब अख्तरच्या मनाला खूप वेदना, पाकिस्तानी टीमला बोलला, ‘तुम्ही…’ VIDEO

Shoaib Akhtar : टीम इंडियाने काल पाकिस्तानला लोळवून, लोळवून मारलं. 25 चेंडू बाकी असतानाच भारताने मोठ्या विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला खूप वेदना झाल्या आहेत. त्याने पाकिस्तानला टीमला भरपूर सुनावलं.

Shoaib Akhtar : टीम इंडियाच्या विजयानंतर शोएब अख्तरच्या मनाला खूप वेदना, पाकिस्तानी टीमला बोलला, 'तुम्ही...' VIDEO
Shoaib Akhtar
| Updated on: Sep 15, 2025 | 11:15 AM
Share

भारत-पाकिस्तान सामन्यावेळी शोएब अख्तरच विश्लेषण नेहमी चर्चेचा विषय असतं. पाकिस्तान जिंकांव अशी त्याची मनापासून इच्छा असते. पण असं कधी होत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचा पडणारा चेहराच सर्वकाही सांगून जातो. यावेळी सुद्धा असच घडलय. पाकिस्तानच्या पराभवानंतर टीव्ही शो मध्ये बसलेल्या शोएब अख्तरने पाकिस्तानी टीमच्या चुकाच दाखवल्या नाहीत, तर त्याने वॉर्निंग सुद्धा दिली. त्याने सलमान आगा अँड कंपनीला म्हटलं की, ‘भारत एक मजबूत संघ आहे. ते तुम्हाला मारणारच’ शोएब अख्तरचा इशारा पाकिस्तानी टीमच्या चुकीकडे होता, स्पिनर्सशी संबंधित ही चूक आहे.

वेगवान गोलंदाजी पाकिस्तानची ताकद आहे. भारताविरुद्ध आशिया कप 2025 च्या सामन्यात पाकिस्तानी टीमने 4 स्पिनर्स खेळवले. पाकिस्तानी टीममध्ये पेसरच्या नावावर फक्त शाहीन शाह आफ्रिदी होता. शोएब अख्तरची जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये गणना व्हायची. पाकिस्तानी टीमची चूक दाखवून देत त्याने विचारलं की, ‘भारतीय टीममध्ये असा एकतरी फलंदाज आहे की, जो स्पिन खेळू शकत नाही’

‘…आणि ते धोपटणार सुद्धा’

शोएब अख्तर म्हणाला की, “स्पिन भारतीय फलंदाजांची ताकद राहिली आहे. अशावेळी त्यांच्या विरोधात जास्त स्पिनर्स खेळवणं ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाडी चालवण्यासारखं आहे. ही पक्की टीम इंडिया आहे, ते स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळू शकतात आणि ते धोपटणार सुद्धा”

‘…तर मार खात रहाल’

पाकिस्तानी टीममध्ये वेगवान गोलंदाजांच्या नसण्याने शोएब अख्तर हैराण झाला. तसच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं. पाकिस्तानी टीमला त्यांच्या चुकीची किंमत चुकवावी लागली आहे. शोएब अख्तरतने वॉर्निंग दिलीय की, ‘पुढेही असच राहिलं,तर मार खात रहाल’

सिक्स मारुन विजयाची स्क्रिप्ट लिहिली

आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 25 चेंडू राखून 128 धावांच लक्ष्य पार केलं. भारताने तीन विकेट गमावले. भारतासाठी सूर्यकुमार यादवने सिक्स मारुन विजयाची स्क्रिप्ट लिहिली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.