Shubaman Gill | शुबमन गिल प्रतिभावान फलंदाज, पण त्याच्यावर दबाव टाकू नये : गौतम गंभीर

शुबमन गिलने (Shubman Gill) ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत एकूण 6 डावांमध्ये 2 अर्धशतकासह 259 धावा केल्या.

Shubaman Gill | शुबमन गिल प्रतिभावान फलंदाज, पण त्याच्यावर दबाव टाकू नये : गौतम गंभीर
शुबमन गिल

मुंबई :शुबमन गिलने (Shubaman Gill) रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला खेळायला हवं, याबाबत काहीच शंका नाही. मात्र आपल्याला याबाबतीत घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको. शुबमन प्रतिभावान खेळाडू आहे. पण त्याने यशाने हुरळून जाता कामा नये कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार आव्हानात्मक आहे, असं टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला. (shubman gill is talent batsman said team india former opener gautam gambhir)

“गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अफलातून सुरुवात झालीये. ऑस्ट्रेलियाविरोधात पदार्पण आणि ऐतिहासिक विजय मिळवणं ही गिलसाठी मोठी उपलब्धी आहे. त्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गिलला अशा प्रकारे आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी पर्याप्त वेळ द्यायला हवा. त्याच्यावर अपेक्षाचं ओझं लादता कामा नये”, असंही गंभीरने यावेळेस नमूद केलं. गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लान या विशेष या कार्यक्रमात बोलत होता.

गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याला दुसऱ्या कसोटीत पृथ्वी शॉच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. त्याने या संधीचं सोनं केलं.

गिलने या पदार्पणातील कसोटीतील पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 45 आणि नाबाद 35 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 50 आणि 31 धावा केल्या. गिलने चौथ्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाला विजयासाठी 300 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता असताना त्याने 91 धावांची खेळी केली. दुर्देवाने त्याचे शतक हुकलं. गिलने भारताच्या विजयाच महत्वाची भूमिका बजावली.

गिलने ऑस्ट्रेलियविरोधातील कसोटी मालिकेतील  एकूण 6 डावांमध्ये 2 अर्धशतकासह 259 धावा केल्या. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनंतर गिल टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

दमदार कामगिरीचं शानदार बक्षिस

गिलला त्याच्या कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे. गिलची इंग्लडंविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी निवड करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्यामुळे गिल मायदेशात इंग्लंडविरोधात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

Shubhman Gill | ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतून मला खूप काही शिकायला मिळालं : शुबमन गिल

AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण

(shubman gill is talent batsman said team india former opener gautam gambhir)

Published On - 6:32 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI