शुभमन गिलची संपत्ती किती? टीम इंडियाचा कर्णधार किती करतो कमाई, आलिशान घरापासून ते कारपर्यंत काय काय
Shubman Gill Net Worth 2025 : शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंड दौरा गाजवला. त्याच्या सहकाऱ्याची चर्चा झाली. पण गिलची संपत्ती किती आहे, तुम्हाला माहिती आहे का? किती करतो तो कमाई?

शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. तो एकदिवसीय सामन्यात कर्णधार होण्याच्या स्पर्धेत सर्वात अव्वल आहे. अवघ्या 25 वर्षीय शुभमन गिलची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्याकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे. बीसीसीआयकडून त्याला पगार मिळतो. तर जाहिरातीच्या माध्यमातून तो मोठी कमाई करतो. त्याची अंदाजित संपत्ती किती आहे?
शुभमन गिलने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 या तीनही फॉर्म्याटमधील जबरदस्त खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 37 कसोटी,55 वनडे आणि 21 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 2647, वनडेमध्ये 2775 आणि टी20 मध्ये 578 धावा आहेत.
शुभमन गिलचा पगार तरी किती?
शुभमन गिल बीसीसीआयच्या वार्षिक करार 2024-2025 च्या यादीत ग्रेड ए मध्ये सहभागी आहे. या श्रेणीत केवळ 6 भारतीय खेळाडू आहेत. या श्रेणीत आल्याने बीसीसीआयकडून गिल याला वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात. तर वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी त्याला वेगवेगळी रक्कम मिळते.
शुभमन गिल याला प्रत्येक सामन्यात किती शुल्क?
एका Test साठी- 15 लाख रुपये
एका ODI साठी- 6 लाख रुपये
एका T20 साठी- 3 लाख रुपये
शुभमन गिलचा आयपीएल पगार तरी किती?
शुभमन गिल हा गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. त्याला IPL 2025 मध्ये 16.5 कोटी रुपये मिळाले. त्यांनी 2018 मध्ये केकेआरसाठी आयपीएल पहिल्यांदा खेळली. या हंगामात त्याला 1.8 कोटी रुपये मिळाले. कोणत्या हंगामात कोणत्या संघाने त्याला किती रक्कम दिली हे समजून येईल.
केकेआर : 2018 ते 2021- 1.8 कोटी (प्रत्येक हंगाम)
गुजरात टायटन्स : 2022 ते 2024- 8 कोटी (प्रत्येक हंगाम)
गुजरात टायटन्स : 2025- 16.5 कोटी
शुभमन गिलची एकूण संपत्ती किती?
OneCricket नुसार, 2025 पर्यंत शुभमन गिलची एकूण संपत्ती 32 ते 34 कोटींच्या घरात होती. बीसीसीआय पगार,आयपीएल पगार आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून गिलची कमाई होते. पंजाबमध्ये फिरोजपूर जिल्ह्यातील जयमल सिंह या गावात त्याचे आलिशान घर आहे.Insidesport च्या वृत्तानुसार, शुभमन गिलकडे Range Rover SUV आहे. तिची किंमत 90 लाखांच्या घरात आहे. त्याच्याकडे Mercedes Benz E350 ही कार आहे. तिची किंमत 90 लाखांच्या घरात आहे. तर त्याच्याकडे 15 लाखांची एक थार पण आहे, जी त्याला भेट म्हणून मिळाली आहे.
