Smriti Mandhana : स्मृती मानधना की पलाश मुच्छल, दोघांमध्ये कोणाचं शिक्षण अधिक ?

Smriti Mandhanas wedding, Smriti Palash Love Story : भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या खासगी आयुष्याममुळे चर्चेत आहे. 23 नोव्हेंबरला तिचा संगीतकार मलाश मुच्छलशी विवाह होणार होता, मात्र आता हे लग्न पोस्टपोन झालं आहे. त्यांच्याबाबत बऱ्याच बातम्या ऐकायला येत आहेत. त्या दोघांपैकी जास्त शिकलेलं कोण ते जाणून घेऊया.

Smriti Mandhana : स्मृती मानधना की पलाश मुच्छल, दोघांमध्ये कोणाचं शिक्षण अधिक ?
Smriti Mandhana and Palash Muchhal
Image Credit source: social media
Updated on: Nov 26, 2025 | 8:47 AM

सांगलीत 23 नोव्हेंबर 2025 रोजी भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Mucchal)  यांचा होणारा विवाह अचानक पुढे ढकलण्यात आला. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांच्या अतिशय क्लोज असणाऱ्या स्मृतीने वडिलांशिवाय लग्नाच्या सप्तपदी घेण्यास नकार दिला. त्यामुळे स्मृती-पलाशचा विवाह पोस्टपोन करण्यात आला. त्यानंतर अचानक पलाश मुच्छचीही तब्येत बिघडली. त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. उपचारानंतर तो व कुटुंबीय मुंबईला परतले, तर स्मृती ही तिच्या कुटुंबियांसोबत वडिलांची काळजी घेत सांगलीत आहे.

हे सगळं सुरू असतानाच स्मृतीने एक मोठा निर्णय घेतला, तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सगळे प्री-वेडिंग फोटोज काढून टाकले. तर पलाश मुच्छलची बहीण पलक हिने प्रायव्हसी देण्याची विनंती केली आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर विविध अफवा , बातम्य समोर येत आहेत. त्यानुसार पलाशने स्मृतीला फसवल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश दोघांचही आयुष्य सध्या बरंच चर्चत आहे.

या सर्वांदरम्यान जाणून घेऊया की स्मृती आणि पलाश यां दोघांचं शिक्षम किती झालं, दोघांमध्ये सर्वाधिक शिकलेलं कोण आहे ?

Smriti Mandhana : स्मृती मंधाना हिचं आलिशान घर; करण जोहरच्या सिनेमाचा सेटही पडेल फिका, वडिलांनी केली लेकीची इच्छा पूर्ण

Smriti Mandhana Education : बीकॉमपर्यंत स्मृतीचं शिक्षण

18 जुलै 1996 साली मुंबईत स्मृती मानधनाचा जन्म झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षी ती सांगलीला स्थलांतरित झाली. कुटुंब इतके क्रिकेटप्रेमी होते की तिचे वडील श्रीनिवास जिल्हा पातळीवर खेळायचे. तिचा भाऊ श्रवणही क्रिकेटपटू बनला आणि तिची आई स्मिता नेहमीच त्यांना पाठिंबा देत असे. स्मृतीने लहानपणीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती डावखुरी फलंदाज आहे, पण तिच्या कुटुंबात सगळेच उजव्या हाताने खेळतात. तिच्या वडिलांनी तिला डाव्या हाताने खेळायला सांगितले, म्हणून तिने तसं खेळायला सुरूवात केली.

स्मृतीने क्रिकेटप्रमाणेच अभ्यासालाही प्राधान्य दिलं. ती शालेय जीवनात टॉपर होती आणि कॉलेजमध्येही क्रिकेटसोबतच तिने त्याचा बॅलन्स साधले. स्मृती मानधनाने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील शारदा श्रम विद्या मंदिर येथे पूर्ण केले. त्यानंतर ती सांगलीला स्थलांतरित झाली आणि त्यानंतर तिने जे.एस. खांडेकर हायस्कूलमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. स्मृती मानधनाने सांगलीच्या चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्समधून बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम) पदवी पूर्ण केली. तिने कोल्हापूरमधील संजय घोडावत विद्यापीठातून बी.कॉमचे पहिले वर्ष पूर्ण केले. एका मुलाखतीत स्मृती म्हणाली की, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यापेक्षा बी.कॉमची परीक्षा देणे अधिक आव्हानात्मक वाटत होते. तिने क्रिकेट खेळता खेळताच शिक्षमही पूर्ण केले.

क्रिकेटमध्येही जलवा

स्मृती मानधनाने 2013 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तिन्ही स्वरूपात शतके करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 2013 मध्ये तिने महाराष्ट्रासाठी एकदिवसीय सामन्यात द्विशतकही केले.2018 आणि 2021 मध्ये तिला आयसीसी महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. 2024 पर्यंत तिची तीन वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये निवड झाली आहे. 2025 साली भारताच्या पहिल्या महिला विश्वचषक विजयात मोलाचा वाटा बजावताणारी स्मृती संघाची उपकर्णधारही होती. तिने 2024 मध्ये आरसीबीला त्यांचे पहिले डब्ल्यूपीएल विजेतेपद मिळवून दिले, तिथे तिला 3.4 कोटी रुपयांत संघात विकत घेण्यात आलं होतं. ती वुमन्स बिग बॅश लीग आणि द हंड्रेडमध्येही खेळली. तिची एकूण संपत्ती 32 ते 34 कोटी रुपये आहे आणि ती बीसीसीआय ग्रेड ए करार आणि नाईकी, रेड बुल, हिरो सारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून दरवर्षी 50 लाख रुपये कमवते. सांगलीमध्ये ती एसएम-18 स्पोर्ट्स कॅफे हे रेस्टॉरंटदेखील चालवते.2019 पासून ती आणि पलाश मुच्छल रिलेशनशिपमध्ये होते.. 2024 साली त्यांनी नात्याची अधिकृत घोषणा केली.

पलाश मुच्छलचे शिक्षण

पलाशची कहाणी स्मृतीपेक्षा थोडी वेगळी आहे. 22 मे 1995 रोजी इंदूरमधील एका मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या पलाशने तिथेच शिक्षण घेतले. त्याचे वडील राजकुमार मुच्छल हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तर त्याची बहीण, पलक, एक प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. कुटुंब संगीतमय होते, म्हणून पलाशने वयाच्या तिसऱ्या वर्षी गायला सुरुवात केली. त्याने किशोरावस्थेत संगीत रचना सुरू केली. पलाश मुच्छल हा देखील बी.कॉमचा पदवीधर आहे. ग्रॅज्युएशन करतानाचा त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि काम करण्यास सुरुवात केली. मुंबईत त्याचा एक स्टुडिओ आहे आणि तो पीएम स्टुडिओमध्ये तरुणांना संगीतही शिकवतो.

2014 साली चर्चेत

पलाश मुच्छल याने 2014साली आलेल्या “ढिश्कियाँ” या चित्रपटातून पदार्पण केले आणि “तू ही है आशिकी” हे गाणे कंपोझ केलं. त्यानंतर “भूतनाथ रिटर्न्स” या चित्रपटाला दिलेलं संगीत खूप गाजलं. त्यातलं “पार्टी तो बनती है” हे गाणं तर सुपरहिट ठरलंच. तसेच त्याने “एनआरआय” मधील “मुसाफिर” आणि “पंचबीट” या वेब सिरीजमधील “इश्कान” सारखी गाणी गायली आहेत. त्याने 40 अधिक म्युझिक व्हिडीओ डायरेक्ट केले असून चित्रपटांतही अभियन केला आहे. बहीण पलक हिच्यासोबत, तो पलक-पलाश चॅरिटेबल फाउंडेशन देखील चालवतो, जे गरीब मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी काम करते. असा दावा केला जातो की या ट्रस्टने आत्तापर्यंत 3800 हून अधिक मुलांना मदत केली आहे.

दोघांची चर्चा का ?

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल सध्या चर्चेत आहेत कारण 23 तारखेला होणार त्यांचे लग्न आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीच्या इमर्जन्सीमुळे सर्व काही थांबवण्यात आले असले तरी त्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. स्मृतीने प्री-वेडिंगचे फोटो डिलीट केल्यामुळे अनेक अफवा पसरल्या आहेत, पण दोन्ही कुटुंबापैकी कोणीच यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.