Smriti Mandhana : स्मृती मंधाना हिचं आलिशान घर; करण जोहरच्या सिनेमाचा सेटही पडेल फिका, वडिलांनी केली लेकीची इच्छा पूर्ण
विख्यात क्रिकेटपटून स्मृती मंधानाचं काल लग्न होणार होतं, मात्र त्याच्या काही तास आधीच तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर स्मृतीने विवाहसोहळा अश्निचित काळासाठी पुढे ढकलला आहे.

Smriti Mandhana Home : भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना (Smriti Mandhan) ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भारतीय महिला संघाला पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप मिळवून देण्यात मोलाचा वाटा बजावणाऱ्या स्मृतीचा संगीतकार-गायक पलाश मुच्छल याच्याशी काल (23 नोव्हेंबर)विवाह होता. लग्नाची फंक्शन्श शुक्रवारपासूनच सांगलीत सुरू झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशीच, रविवारी सकाळी तिच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागलं, हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांची बिघडलेली प्रकृती पाहून स्मृतीने विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
खरंतर लग्नाचा दिवस सर्वांसाठी खास असतो तसाच तो पलाश आणि स्मृतीसाठीही खूप खास होता. आणि त्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे हे लग्न स्मृतीच्या नव्या घरी होणार होतं, एखाद्या चित्रपटातील आलिशान सेटसारखं असलेलं हे घर पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल. वडिलांनीच लाडक्या लेकीसाठी हे घर खास बांधून घेतलं होतं.
फिल्मी स्टाईलमध्ये बनवला घराचा एंट्रन्स
मूळची सांगलीची रहिवासी असलेल्या स्मृती मंधानाचं नवं आलिशान घर याच शहराच्या बाहेरच्या भागात बनलं होतं. हे घर पाहून एखाद्या फिल्म सेटची आठवण येईल. मी करण जोहरची मोठी चाहती आहे, त्यामुळे मी आम्चाया घराचा एंट्रन्स असाच मोठा, भव्य बनवला असं स्मृतीनेच सांगितलं होतं. प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर जतिन सप्रू यांच्याशी एका खास मुलाखतीत बोलताना ,स्मृतीने हा खुलासा केला होता. त्याततिने आलिशान घराची झलकही दाखवली. लग्नाच्या समारंभा दरम्यान याच प्रवेशद्वारावरून टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्मृतीसोबतच्या त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो पोस्ट केले.
स्मृती पलाशच्या लग्नाचे विधी याच घरात पार पडत होते आणि 23 नोव्हेंबरला लग्नानंतर स्मृती हिची पाठवणी याच घरातून होणार होती, परंतु तिच्या वडिलांच्या हार्ट अटॅकमुळे आनंदाचे वातावरण पूर्णपणे बदलले. स्मृती, ही तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. त्यामुळेच आपले वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेवटच्या क्षणी लग्न पुढे ढकलावे लागले. स्मृती आणि वडिलांच्या खूप जवळ आहे आणि हे या मुलाखतीवरून स्पष्ट दिसत होते.
वडिलांनी लेकीसाठी केलं हे खास काम
हा जुना इंटरव्ह्यू सध्या व्हायरल झाला आहे. त्यात स्मृती मंधानाचे वडील मोकळेपणे बोलले.स्मृतीने तुम्हाला कधी त्रास दिला का, किंवा तुम्ही कधी तिला ओरडलात का, असा सवाल त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. तेव्हा तिचे वडील म्हणाले की स्मृतीने तिच्या आईचा तर ओरडा खाल्ला आहे, पण मी कधी रागावलो नाहीये. स्मृतीच्या वडिलांनी असेही सांगितलं की ती नेहमीच त्यांच्यासमोर हट्ट करते, पण कधीही त्यांच्या क्रिकेटपटू मुलीला नकार दिला नाही आणि तिने जे काही मागितले ते सगळं तिला दिलं, अशी आठवणही त्यांनी सांगितली. आपल्या मुलीबद्दलच्या या प्रेमामुळे आणि स्मृतीच्या तिच्या वडिलांवरील प्रेमामुळेच श्रीनिवास मंधाना यांनी नवीन घरात लेकीचे खूप फोटो लावले आहेत.
