AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding : स्मृती-पलाश यांचं लग्न टळल्यावर ‘ती’ पुढे आली, थेट सांगितलं नात्याचं सत्य

Palash-Smriti Marriage : कौटुंबिक इमर्जन्सीमुळे क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न थांबवण्यात आलं. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृतीने लग्न पुढे ढकललं असं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर पलाश मुच्छल याने फसवणूक केल्याच्या, त्याच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. यानंतर एका कोरिओग्राफरने स्पष्टीकरण दिलं होत आणि आता दुसऱ्या तरूणीनेही समोर येऊन नात्याचं सत्य सांगितलं.

Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding : स्मृती-पलाश यांचं लग्न टळल्यावर 'ती' पुढे आली, थेट सांगितलं नात्याचं सत्य
पलाशश नाव जोडलं गेल्यावर तिचं स्पष्टीकरणImage Credit source: social media
| Updated on: Nov 29, 2025 | 12:49 PM
Share

Palash Muchhal and Smriti Mandhana Marriage Update : भारतीय महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतयी महिला संघाने वर्ल्डकप जिंकताच सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आली ती म्हणजे स्मृती मानधनाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली. संगीतकार पलाश मुच्छलसोबत (Palash Muchhal) ती 23 नोव्हेंबरला सांगतील विवाह करणार होती. सर्व विधि, समारंभ झाले, पण कौटुंबिक कारणास्तव स्मृती-पलाशचे लग्न पुढे ढकण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर पलाशची प्रकृतीही बिघडल्याची बातमी आली.

पण याचदरम्यान, पलाशच्या अफेअर्सबद्दल अफवा येऊ लागल्या ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले. याप्रकरणात दोन कोरिओग्राफर तरूणींची नावं समोर आली ज्यांचं पलाशशी अफेअर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता त्या अफवांना फुलस्टॉप लागला आहे. याप्रकरणात पहिले काल कोरिओग्राफर गुलनाझ खानने तिच्या अकाऊंटवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं होतं. तर आता दुसरी कोरिओग्राफर तरूणी नंदिका द्विदेदी हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ती काय म्हणाली ते जाणून घेऊया.

काय आहे नंदिकाची पोस्ट ?

या सग्ळया प्रकरणात नाव येऊ लागल्यावर नंदिकाने आधी तिचं अकाऊट प्रायव्हेट केल होतं, आता तिने याप्रकरणी एक भलंमोठ्ठं स्टेटमेंट शेअर केलं आहे. ‘ गेल्या काही दिवसांपासून, मी पहात आहे की माझं नाव अशा परिस्थितीशी जोडलं जातंय, ज्यामुळे एखाद्याला खूप वैयक्तिक त्रास झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझ्याबद्दल जे अंदाज लावले जात आहेत आणि मी कोणाच्या तरी नात्याच्या मधे आले, असं जे बोललं जात आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या गोष्टीचा मी भागही नाही त्यात माझं नाव गुंतलेलं पाहणं हे खूप वाईट आहे. या निराधार नॅरेटिव्हने कथेला पूर्णपणे कसं बदलून टाकलं आहे हे समजून घेणे देखील खूप कठीण आहे ‘ असं तिने लिहीलं आहे.

तिच्या स्पष्टीकरणाचा शेवट करताना नंदिका म्हणाली, ‘ याप्रकरणातून बाहेर पडणं मला खूप कठीण जाणार आहे. मी चुकीचे आरोप झेलू शकत नाही. ज्यांना माझी काळजी आहे, त्या लोकांनाही माझ्यामुळे उगाच त्रास सहन करावा लागतोय. आणि तेही अशा माहितीमुळे जी चुकीची आहे. यामुळे माझ्या मानसिक स्थितीवर खूपच परिणाम होतोय’ असंही तिने लिहीलं आहे.

तिचं हे स्टेटमेंट सध्या चर्चेत आलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात असून स्मृती किंवा पलाश दोघांपैकी कोणीही यावर अजून मौन सोडलेलं नाहीये

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.