AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Pickleball Tournament | स्नेहलचा सुवर्ण षटकार; 6 विभागात पदकांची लयलूट, आशियाई ओपनमध्ये भारताचे नेतृत्व करणार

दुसऱ्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत जळगावच्या स्नेहल पाटीलने जोरदार कामगिरी करत तब्बल 6 सुवर्णपदक पटकावले आहेत.

National Pickleball Tournament | स्नेहलचा सुवर्ण षटकार; 6 विभागात पदकांची लयलूट, आशियाई ओपनमध्ये भारताचे नेतृत्व करणार
स्नेहल पाटील.
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 11:52 AM
Share

डोंबिवलीः डोंबिवली येथील पलावा ऑलिम्पिक स्पोर्ट सेंटरमध्ये झालेल्या दुसऱ्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत जळगावच्या स्नेहल पाटीलने जोरदार कामगिरी करत तब्बल 6 सुवर्णपदक पटकावले आहेत. विशेष म्हणजे तिला स्पर्धेतील सर्वोत्तम एमव्हीपीचा पुरस्कार मिळाला आहे. पुढच्या वर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या आशियाई ओपन स्पर्धेत ती आता भारताचे नेतृत्वही करणार आहे.

20 राज्यातील खेळाडू

डोंबिवलीतल्या पलावा ऑलिम्पिक स्पोर्टमध्ये सुरू असलेल्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेसाठी 20 राज्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी हजेरी लावली होती. स्पर्धेत पुरुष एकेरीत झारखंडच्या सोनुकुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याने महाराष्ट्राच्या तेजस महाजनचा पराभव केला. पुरुष दुहेरीत गौरव राणे आणि कश्यप बरनवाल जोडीने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अनिकेत आणि प्रणवला नमवले. महिला दुहेरीत स्नेहल आणि वृषालीने अनन्या-द्रिशीका जोडीला धूळ चारली. मिश्र दुहेरीतही स्नेहल-कुलदीपने अजय-वृषालीचा पराभव केला.

स्नेहलचे अनोखे यश

दुसऱ्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत स्नेहलने महिला एकेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, 19 वर्षांखालील मुलींची एकेरी, 19 वर्षांखालील मुलींची दुहेरी, 19 वर्षांखालील मिश्र दुहेरी अशा 6 विभागात सुवर्णपदकांची अक्षरशः लयलूट केली आहे. विशेष म्हणजे स्पर्धेतला सर्वोत्तम एमव्हीपीचा पुरस्कारही तिने मिळवला आहे. आता पुढच्या वर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या आशियाई ओपन स्पर्धेत ती भारताचे नेतृत्वही करणार आहे. तिच्या या तडाखेबाज कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

पिकलबॉल प्रचंड लोकप्रिय

पिकलबॉल खेळ सध्या प्रचंड लोकप्रिय होतोय. कारण सर्व वयोगटातील लोक हा खेळ खेळू शकतात. यात दुखापतीची जोखमी नसते. या खेळामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा व्यायाम होतो. पिकलबॉलचे कोर्ट टेनिस कोर्टापेक्षा लहान असते. पिकबॉलचा चेंडू टेनिस बॉलपेक्षा खूप हलका असतो. या सरासरी खेळाचा कालावधी 12 मिनिटे आहे. यामुळे खेळाडूंना वारंवार ब्रेक घेता येणे शक्य होते. हा खेळ पॅडल्ससह खेळला जातो. त्यात बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिससह इतर अनेक रॅकेट गेमसारखे घटक असतात. याचे पॉईंट स्कोअरिंग बॅडमिंटन आणि टेनिस सारखेच आहे. यातही आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळवून सामना जिंकला जातो.

इतर बातम्याः

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीत सलग तीन वादळी शतकं, दिलीप वेगंसरकर म्हणतात ‘हीच ती वेळ’

Nashik| बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…

Bhavya Kashi, Divya Kashi: भाजपचा राज्यभरात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रम; फडणवीस, पाटील, मुंडे सहभागी होणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.