AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hind Kesari | महाराष्ट्रातील पैलवानाने मारले हिंद केसरीचे मैदान, बोलू खत्रीचा पराभव करत समाधान पाटील राष्ट्रीय विजेते

samadhan patil win Hind Kesari Kitab | समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला हा किताब मिळाला.

Hind Kesari | महाराष्ट्रातील पैलवानाने मारले हिंद केसरीचे मैदान, बोलू खत्रीचा पराभव करत समाधान पाटील राष्ट्रीय विजेते
Wrestler Samadhan Patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 22, 2024 | 9:39 AM
Share

सागर सुरवसे, सोलापूर, दि. 22 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सलग दुसऱ्या वर्षी मोहोर उमटली आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील हा 2024 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हिंद केसरी स्पर्धा आहे.

समाधान पाटील शेतकरी कुटुंबातील

समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात जाते की दिल्लीकडे जाते, याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर सलग दुसऱ्या वर्षी ही गदा महाराष्ट्रात आली.

मागील वर्षी महाराष्ट्राकडे गदा

तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला यश मिळाले आहे. २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके यांनी हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव करुन विजेतेपद मिळवले होते. अभिजीत कटके हा २०१७ सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे.

‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब मिळवला

समाधान पाटील हा मूळचा मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावचा रहिवासी आहे. समाधानने 2010 सालपासून पैलवानकी करत आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या ‘सीएम केसरी’चा किताब तसेच 2017 सालचा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला आहे. समाधान पाटील हा सोलापुरातील भरत मेकाले यांच्या तालमीत सराव करत होता. त्यानंतर काही काळ दिल्लीतही सराव केला आहे.

महाराष्ट्राचा दबदबा कायम

समाधान पाटील हा शेतकरी कुटुंबातला आहे. शेती हा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. मागील वर्षी ‘हिंदकेसरी’चा किताब महाराष्ट्रातील अभिजीत कटके याने पटकवला होता त्यानंतर यंदाच्या वर्षी समाधान पाटलाने हा किताब पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...