दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डेलने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं होतं. 36 वर्षीय डेल स्टनने आतापर्यंत 93 सामने खेळले. यात त्याने 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 05, 2019 | 9:42 PM

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डेलने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं होतं. 36 वर्षीय डेल स्टनने आतापर्यंत 93 सामने खेळले. यात त्याने 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन डेलच्या निर्णयाला दुजोरा देत माहिती दिली. ते म्हणाले, “डेल स्टनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे आधुनिक युगातील एक महान वेगवान गोलंदाजाच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीवर पडदा पडला आहे.”

आपल्या अन्य एका ट्विटमध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने डेनचे मत मांडले आहे. त्यात त्यांनी म्हटले, “पुन्हा कधीही कसोटी सामना न खेळण्याचा विचार करणे हे खरंतर खूप कठिण आहे. मात्र, यापेक्षा कधीही कोणताही सामना न खेळणे हे जास्त भीतीदायक आहे. त्यामुळेच मी माझ्या उर्वरित कारकिर्दीत टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष्य केंद्रित करत आहे. त्यातून माझी क्षमता वाढेल आणि या खेळात अधिकाधिक काळ मी राहू शकेल.”

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने डेनचा हा निर्णय दुःखद असल्याचेही म्हटले. ते म्हणाले, “आम्हाला डेनचा निर्णय ऐकून दुःख झाले. मात्र, व्यवस्थापनाला त्याचा हा निर्णय स्वीकारावा लागेल. आम्ही त्याच्या देशासाठीच्या खेळातील योगदानाबद्दल आभार मानतो. त्याला भविष्यात सर्वकाही मिळो ही सदिच्छा.”


डेल पुढील पिढ्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शनक बनेल असाही विश्वास दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने व्यक्त केला. तसेच तो क्रिकेटमधील एक महान खेळाडू असल्याचेही नमूद केलं.

डेल स्टेन म्हणाला, “मी आज मला आवडणाऱ्या क्रिकेट प्रकारापासून दूर जात आहे. माझ्यामते कसोटी क्रिकेट क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे. यात तुमची मानसिक, शारिरीक आणि भावनिक कसोटी लागते. मी क्रिकेटमधील कुणाही एकाचे नाही, तर प्रत्येकाचे आभार मानतो. कारण यातील प्रत्येकजण माझ्या क्रिकेटमधील प्रवासाचा भाग राहिला आहे. मी पुढील काळात दक्षिण आफ्रिकेसाठी मर्यादित षटकांच्या सामन्यत खेळत राहिल.” यावेळी दक्षिण आफ्रिका किक्रेट मंडळाने डेन यापुढे 2019-20 मधील टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा करारबद्ध खेळाडू असेल असेही नमूद केले.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें