AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेहवाग, गांगुली-धोनीपेक्षा अधिक रन्स, तरीही संघाबाहेर, मात्र पुढे थेट ऑस्ट्रेलियाच्या गोटात!

श्रीधरन श्रीराम याने 19 मार्च 2000 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. | Sridarhan Sriram

सेहवाग, गांगुली-धोनीपेक्षा अधिक रन्स, तरीही संघाबाहेर, मात्र पुढे थेट ऑस्ट्रेलियाच्या गोटात!
Sridahran
| Updated on: Feb 22, 2021 | 9:44 AM
Share

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात 2004 साली झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला. या मलिकेत भारताला एका सामन्यात बांग्लादेशकडून एका पराभवाचा सामना करावा लागला. याच सिरिजमधून भारताला महेंद्रसिंग धोनीसारखा उत्तम क्रिकेटपटू, फलंदाज तसंच जागतिक दर्जाचा अव्वल कर्णधार मिळाला. पण याच सिरीजनंतर एका क्रिकेटपटूचं करिअर संपल्यात जमा झालं. ते ही जी मॅच भारत बांग्लादेशविरुद्ध हारला होता त्याच मॅचमध्ये त्याने सेहवाग-गांगुली-धोनीपेक्षा अधिक रन्स केले होते तसंच एक महत्त्वाची विकेटही घेतली होती… त्या खेळाडूचं नाव आहे भारताच्या मधल्या फळीतील माजी फलंदाज तथा पार्ट टाईम फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम याच्याबद्दल…! (Sridarhan Sriram Former indian Cricketer Australian Spin Bowling Coach)

श्रीधरन श्रीराम याचा आज 45 वा वाढदिवस… श्रीरामने आपलं क्रिकेट करिअर एक स्पिनर म्हणून सुरु केलं. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. अंडर 19 मध्ये साऊथ आफ्रिका दौऱ्यावर त्याने 29 बळी मिळवले. याचसोबत त्याने बॅटनेही आपला करिश्मा दाखवायला सुरु केला. 1999-2000 मध्ये त्याने 5 खणखणीत शतक ठोकून भारतीय संघाच्या दारात धडक मारली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची खराब सुरुवात

19 मार्च 2000 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु डेब्यु मॅच त्याच्यासाठी निराशाजनक ठरली. बोलिंगध्ये त्याला मार पडला तर त्याच्या बॅटने म्हणावा असा जोर दाखवला नाही. 12 रन्स करुन तो संघात परतला. त्याच वर्षी त्याला 5 सामने खेळण्याची संधी मिळाली परंतु त्याला संधीचं सोनं करता आलं नाही.यानंतर भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी त्याला 4 वर्षांची वाट पाहावी लागली.

सगळ्यात यशस्वी खेळाडू पण तरीही संधई मिळाली नाही

4 वर्षांनंतर त्याला बांग्लादेश दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या मॅचमध्ये त्याने 3 रन्स केले तर तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या फरफॉर्मन्सच्या जोरावर त्याला पुढच्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याच मॅचमध्ये त्याने भारताकडून सर्वाधिक 57 धावा केल्या. चांगली खेळी करुनही त्याला संघात पुन्हा जागा मिळाली नाही.

बागी लीगशी संबंध, BCCI ने लावला प्रतिबंध

श्रीरामचा त्या खेळाडूंमध्ये समावेश होता जे खेळाडू बागी लीगशी संबंधित होते. 2007 साली सुभाषचंद्र बागी लीगमध्ये तसंच इंडियन क्रिकेटमध्ये लीगमध्ये श्रीराम खेळला. याचमुळे बीसीसीआयने त्याच्या खेळण्यावर प्रतिबंध आणले. 2 वर्षांनंतर बोर्डाने त्याला माफ केलं . त्यानंतर आयपीएलमध्ये RCB कडूनही तो खेळला. मात्र चांगलं प्रदर्शन करण्यात त्यात अपयश आलं.

श्रीराम ऑस्ट्रेलियाच्या गोटात

भारतात संधी मिळत नाही हे हेरुन श्रीराम यांनी ऑस्ट्रेलिया गाठलं. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया ए टीमच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षपदाचा चार्ज त्यांनी स्वीकारला. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॅनेजमेंटचा विश्वास त्यांनी कमावला. हळूहळू ते ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल टीमचा हिस्सा बनले. पुढे अॅशेस आणि भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी ते कोचिंग टीमचा हिस्सा होते.

हे ही वाचा :

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

Video | IPL 2021 च्या आधी CSK साठी गुड न्यूज, 18 चेंडूत 86 धावांची तुफानी खेळी, ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना पुनरागमनासाठी सज्ज

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.