भारताची सात वर्षांची प्रतीक्षा संपली, यूएस ओपनमध्ये सुमित नागलचा ऐतिहासिक विजय

23 वर्षांचा सुमित नागल गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारताची सात वर्षांची प्रतीक्षा संपली, यूएस ओपनमध्ये सुमित नागलचा ऐतिहासिक विजय
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 8:25 AM

न्यूयॉर्क : भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. (Sumit Nagal becomes first Indian to win a match at the US Open in 7 years)

यूएसचा प्रतिस्पर्धी ब्रॅडले क्लान याला मंगळवार 1 सप्टेंबर रोजी पराभवाची धूळ चारत नागलने यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. 6-1, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये सुमित नागलने विजय मिळवला. अवघ्या 23 वर्षांचा सुमित गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

नागलने क्लानविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 असा धमाकेदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये, क्लानने नागलवर मात केली आणि सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला. त्यानंतर सुमितने पुन्हा चौथ्या सेटमध्ये बाजी मारत 6-1 अशी आघाडी मिळवली.

जागतिक क्रमवारीत 122 व्या क्रमांकावर असलेल्या नागलचा यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल.

कोण आहे सुमित नागल?

सुमित नागलने गेल्याच वर्षी यूएस ओपनमधून ग्रँडस्लॅमच्या विश्वात पाऊल ठेवलं होतं. ग्रँडस्लॅमच्या पदार्पणातच त्याने टेनिस सम्राट रॉजर फेडररच्या नाकी नऊ आणले होते. या सामन्यात पहिला सेट जिंकत सुमितने फेडररच्या वर्चस्वाला धक्का दिला. सुमितने त्यावेळी फेडररला अक्षरशः घामटं फोडलं होतं. मात्र नंतरच्या तीन सेट्समध्ये सुमितला कडवी झुंज देत फेडररने सामना खिशात घातला होता. फेडररविरोधात एखादा सेट जिंकणारा सुमित हा पहिलाच भारतीय ठरला होता. (Sumit Nagal becomes first Indian to win a match at the US Open in 7 years)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.