आधी टीम इंडियात निवड, आता रोहित शर्माच्या फेव्हरेट खेळाडूचं वादळ, 58 चेंडूत 133 धावा

पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) धडाकेबाज नाबाद 227 धावांच्या जोरावर मुंबईने 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या.

आधी टीम इंडियात निवड, आता रोहित शर्माच्या फेव्हरेट खेळाडूचं वादळ, 58 चेंडूत 133 धावा
सूर्यकुमार यादव

जयपूर : विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत मुंबई संघाने पुद्दुचेरीविरोधात धावांचा डोंगर उभा केला आहे. पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) धडाकेबाज नाबाद 227 धावांच्या जोरावर मुंबईने 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या. पुद्दुचेरीविरोधातील या सामन्यात पृथ्वी शॉने दाणादाण उडवलीच, मात्र मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माचा (Rohit Sharma) फेव्हरेट खेळाडूही या सामन्यात चमकला. मुंबईकर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) वादळी शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने 58 चेंडूत 4 चौकार आणि 22 चौकारांच्या सहाय्याने 133 धावा ठोकल्या.

एकीकडे पृथ्वी शॉ बरसत होता तर दुसरीकडे मुंबईचा सूर्यकुमार यादवही तळपत होता. सूर्यकुमार यादवने अवघ्या 58 चेंडूत 133 धावा ठोकल्या. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्यात जणू फटकेबाजीची स्पर्धाच लागली होती. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत तब्बल 201 धावांची भागीदारी रचली.

पृथ्वी शॉच्या धडाकेबाज नाबाद 227 धावा

या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने घणाघाती फलंदाजी केली. 21 वर्षीय पृथ्वी शॉने आपल्या झंझावाती खेळीत 27 चौकार आणि 4 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने 152 चेंडूत नाबाद 227 धावा ठोकल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या कर्णधाराने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

पृथ्वी शॉच्या धडाकेबाज नाबाद 227 धावा आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर, मुंबईने 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या.

रोहित शर्माचा फेव्हरेट – सूर्यकुमार यादव

मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव (Mumabi Indians Suryakumar Yadav) याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) धडाकेबाज कामगिरी केली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माचा तो फेव्हरेट खेळाडू आहे.

इंग्लंडविरुद्ध T20 साठी निवड

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (India vs England T 2o Series) टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची शनिवारी 20 फेब्रुवारीला घोषणा करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाच्या काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झालं. तर काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. यामध्ये मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर संधी मिळाली. सूर्यकुमारला वयाच्या 30 व्या वर्षी बीसीसीआयने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली आहे. सूर्यकुमारला आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये केलेल्या मेहनतीचे फल मिळाले आहे.

सूर्यकुमारची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी

सूर्यकुमार आयपीएलच्या गेल्या मोसमात 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकनंतर सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. आयपीएल 2019 मध्ये सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या. आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 86 डावांत फलंदाजी करताना 30.2 च्या सरासरीने सूर्यकुमारने 2024 धावा फटकावल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

Prithvi Shaw : इंग्लंडविरुद्ध वगळं, मात्र विजय हजारे ट्रॉफीत बरसला, पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान 227* धावा

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार 

आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा, रोहित शर्माचा फेवरेट खेळाडू इंग्लडविरुद्ध मैदानात उतरणार?

Published On - 3:00 pm, Thu, 25 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI