AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा, रोहित शर्माचा फेवरेट खेळाडू इंग्लडविरुद्ध मैदानात उतरणार?

मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव (Mumabi Indians Suryakumar Yadav) याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) धडाकेबाज कामगिरी केली होती.

आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा, रोहित शर्माचा फेवरेट खेळाडू इंग्लडविरुद्ध मैदानात उतरणार?
सूर्यकुमार यादव
| Updated on: Feb 17, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव (Mumabi Indians Suryakumar Yadav) याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) धडाकेबाज कामगिरी केली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) सूर्यकुमारची भारतीय संघात नक्कीच निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सूर्यकुमारची एकदिवसीय, टी 20 किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला स्थान देण्यात आलं नाही. चमकदार कामगिरीनंतरही सूर्युकमारला संधी मिळाली नाही. सूर्यकुमार गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघाचं दार ठोठावतोय. अखेर आता त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव यालादेखील संधी मिळू शकते. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. भारतीय निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी 20 खेळाडूंचा एक कोर ग्रुप बनवणार आहे. इंग्लंडविरोधात संधी मिळाली आणि त्यात सूर्यकुमारने चांगलं प्रदर्शन केलं तर त्या कोर ग्रुपसाठी सूर्यकुमारचा विचार होऊ शकतो.

सूर्यकुमारची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी

सूर्यकुमार आयपीएलच्या गेल्या मोसमात 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकनंतर सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. आयपीएल 2019 मध्ये सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या. आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 86 डावांत फलंदाजी करताना 30.2 च्या सरासरीने सूर्यकुमारने 2024 धावा फटकावल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही ‘सूर्य’ तळपला

30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.

हेही वाचा

आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक

IPL Mumbai Indians Retained-Released Players 2021: मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याबाबत मोठा निर्णय

(Suryakumar Yadav likely to get chance in Indian team against England T20I series)

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.